
Mahatma Gandhi Punyatithi 2025 Quotes In Marathi: शांतता, सहिष्णुता, आणि अहिंसेच्या मार्गावर चालण्याचा संदेश देणारे मोहनदास करमचंद गांधी म्हणजेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 30 जानेवारी रोजी पुण्यतिथी (Mahatma Gandhi Punyatithi 2025). याच दिवशी 1948 साली नथुराम गोडसेने त्यांची हत्या केली. गांधीजींच्या स्मरणार्थ, भारतात 30 जानेवारी हा दिवस 'शहीद दिन' म्हणून ओळखला जातो. या दिवशी, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री दिल्लीतील राजघाट येथे गांधीजींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण करतात आणि दोन मिनिटांचे मौन पाळून त्यांना आदरांजली वाहतात. गांधीजींनी सत्य आणि अहिंसेच्या तत्त्वांचा पुरस्कार करून भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक आंदोलने झाली- चंपारण सत्याग्रह, असहकार चळवळ, दांडी यात्रा आणि भारत छोडो आंदोलन, ज्यामुळे अखेर भारताला स्वातंत्र्य मिळाले.
त्यांचे कार्य केवळ स्वातंत्र्यासाठी मर्यादित नव्हते, तर त्यांनी समाजसुधारणा, स्वावलंबन आणि जागतिक शांततेसाठीही मोलाचे योगदान दिले. मार्टिन ल्यूथर किंग, नेल्सन मंडेला यांसारख्या नेत्यांनी गांधीजींच्या अहिंसेच्या तत्वांचा स्वीकार केला. युनेस्कोने गांधी विचारांना जागतिक वारसा म्हणून मान्यता दिली. म्हणूनच महात्मा गांधींच्या पुण्यतिथीचा हा दिवस केवळ त्यांच्या बलिदानाची आठवण करून देण्यासाठी नाही, तर त्यांच्या विचारांचा आणि तत्त्वज्ञानाचा सन्मान करण्यासाठी देखील आहे.
या राष्ट्रपित्याच्या पुण्यतिथीनिमित्त, त्यांच्या शिकवणींना स्मरण करून, आपण त्यांच्या आदर्शांचा अवलंब करण्याचा संकल्प करू शकतो. यासाठी काही खास Images, WhatsApp Status, Messages द्वारे त्यांचे प्रेरणादायी विचार शेअर करून त्यांना अभिवादन करा. (हेही वाचा: Balidan Mas 2025 Date: बलिदान मास कधी आहे? काय आहे यामागचा इतिहास? जाणून घ्या सविस्तर)






दरम्यान, बॅरिस्टर मोहनदास करमचंद गांधी यांनी सार्या भौतिक सुखांवर पाणी सोडून देशासाठी आपले आयुष्य वेचले. 1930 मध्ये टाइम मासिकाने गांधी यांना ‘द मॅन ऑफ दी इयर’ म्हणून संबोधित केले होते. तर गांधीजींना महात्मा ही उपाशी रवींद्रनाथ टागोर यांनी दिली आहे. 30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसेने बिरला हाऊस, नवी दिल्ली येथे संध्याकाळी गांधीजींची हत्या केली. या दिवसाला 'शहीद दिन' म्हणून ओळखले जाते, ज्याद्वारे गांधीजींसह देशासाठी बलिदान दिलेल्या शूरवीरांना श्रद्धांजली अर्पण केली जाते.