Balidan Mas 2025 Date: बलिदान मास कधी आहे? काय आहे यामागचा इतिहास? जाणून घ्या सविस्तर

छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी देखील धर्मासाठी बलिदान दिले. त्यांचे बलिदान आजच्या पिढीला समजावे, यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे दरवर्षी धर्मवीर बलिदान मास (Balidan Mas 2025) पाळण्यात येतो.

Balidan Mas 2025 Date: बलिदान मास कधी आहे? काय आहे यामागचा इतिहास? जाणून घ्या सविस्तर
Balidan Mas 2025 (फोटो सौजन्य - File Image)

Balidan Mas 2025 Date: भारतातील हिंदू धर्माचे रक्षण करण्यासाठी अनेक वीरांनी आपले प्राण अर्पण केले आहेत. छत्रपती संभाजी राजे भोसले (Chhatrapati Sambhaji Raje Bhosale) यांनी देखील धर्मासाठी बलिदान दिले. त्यांचे बलिदान आजच्या पिढीला समजावे, यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे दरवर्षी धर्मवीर बलिदान मास (Balidan Mas 2025) पाळण्यात येतो. 2024 मध्ये 10 मार्च ते 8 एप्रिल या दरम्यान बलिदान मास पाळण्यात आला होता. दरवर्षी बलिदान मास काळात शिवप्रतिष्ठानतर्फे गावोगावी जागृती केली जाते.

2025 मध्ये बलिदान मास कधी आहे?

बलिदान मास हा मराठा योद्धा छत्रपती संभाजी महाराज यांच्या हौतात्म्याचे स्मरण करण्याचा काळ आहे. बलिदान मास काळात शंभूभक्त धार्मिक विधी करतात. संपूर्ण महिनाभर बलिदान मास पाळून शंभूराजांना श्रद्दांजली वाहिली जाते. याशिवाय, अनेक ठिकाणी तरुण मंडळी आपली आवती एखादी वस्तू किंवा पदार्थ महिनाभर वर्ज्य करून बलिदान मास पाळतात. याशिवाय, दरवर्षी बलिदान मासाच्या शेवटच्या दिवशी मूक पदयात्रा काढली जाते. 2025 मध्ये बलिदान मासच्या नेमक्या तारखा अद्याप उपलब्ध नाहीत.

संभाजी महाराजांचे जीवन आणि शौर्य -

छत्रपती संभाजी राजे भोसले यांचा जन्म 14 मे 1657 रोजी आई सोयराबाईच्या पोटी झाला. 3 एप्रिल 1680 रोजी शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर, संभाजींनी हिंदू साम्राज्याची सूत्रे हाती घेतली. भारतात हिंदू स्वराज्य आणि हिंदू साम्राज्याची अभिमानाने स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या अत्यंत निघृणपणे करण्यात आली होती. संभाजी महाराजांचे जीवन आणि शौर्य इतके होते की, औरंगजेबासह संपूर्ण मुघल सैन्य त्यांच्या नावाचा उल्लेख करताच थरथर कापत असे. संभाजी महाराजांच्या घोड्याच्या खुरांचा आवाज ऐकताच मुघल सैनिकांच्या हातातून शस्त्रे खाली पडायची.

संभाजी महाराजांनी 120 युद्ध लढवली -

संभाजी त्यांच्या शौर्यासाठी खूप प्रसिद्ध होते. संभाजी महाराजांनी त्यांच्या छोट्या कारकिर्दीत 120 युद्धे लढली आणि त्यापैकी एकाही युद्धात त्यांचा पराभव झाला नाही. 1680 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर संभाजी राजे गादीवर विराजमान झाले. त्याच्या पराक्रमी शौर्यामुळे तो मुघल सम्राट औरंगजेबाला त्रास होऊ लागला. संभाजी महाराजांना कैद केल्यानंतर औरंगजेबाने क्रूरता आणि अमानुषतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. औरंगजेबाने त्यांची जीभ कापली, डोळे बाहेर काढण्यात आले. त्याच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणला. त्या बदल्यात, औरंगजेबाने संभाजी महाराजांना आपला जीव वाचवण्याचे आश्वासन दिले.

औरंगजेबाकडून संभाजी महाराजांची निघृण हत्या -

परंतु, औरंगजेबाचा हा प्रस्ताव नाकारल्याने संभाजी महाराज आणि त्यांच्या साथीदारांची हत्या करण्यात आली आणि मृतदेहांचे तुकडे करण्यात आले. जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचे तुकडे तुळापूरच्या नदीत टाकण्यात आले तेव्हा त्या काठावर राहणाऱ्या लोकांनी मृतदेहाचे तुकडे गोळा केले. शरीराचे अवयव एकत्र जोडल्यानंतर, विधीनुसार, महाराजांचे अंतिम संस्कार करण्यात आले.

(The above story first appeared on LatestLY on Jan 28, 2025 02:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).