IND vs ENG 4th T20I: उद्या पुण्यात होणार भारत आणि इंग्लंड यांच्या टी-20 मालिकेतील चौथा सामना; पिंपरी-चिंचवड पोलिसांनी जाहीर केले वाहतुकीमधील बदल, जाणून घ्या सविस्तर (Video)

सामन्याला होणारी गर्दी पाहता, सामन्याच्या अगोदर, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाच्या अगदी जवळ असलेल्या या स्टेडियमच्या सभोवतालच्या वाहतुकीमधील बदलांची घोषणा केली आहे. पिंपरी-चिंचवडचे पोलीस उपायुक्त (वाहतूक) बापू बांगर यांनी याबाबत अधिसूचना जारी केली आहे.

IND vs ENG 4th T20I: उद्या पुण्यात होणार भारत आणि इंग्लंड यांच्या टी-20 मालिकेतील चौथा सामना; पिंपरी-चिंचवड पोलिसांनी जाहीर केले वाहतुकीमधील बदल, जाणून घ्या सविस्तर (Video)
Maharashtra Cricket Association Stadium, Pune (Photo Credit - X)

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेतील (India VS England T20I) चौथा सामना 31 जानेवारी 2025 रोजी पुण्यातील (Pune) महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) स्टेडियम, गहुंजे येथे खेळवला जाणार आहे. संध्याकाळी 7 वाजता सामना सुरू होईल, तर नाणेफेक 6:30 वाजता होईल. सामन्याला होणारी गर्दी पाहता, सामन्याच्या अगोदर, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाच्या अगदी जवळ असलेल्या या स्टेडियमच्या सभोवतालच्या वाहतुकीमधील बदलांची घोषणा केली आहे. पिंपरी-चिंचवडचे पोलीस उपायुक्त (वाहतूक) बापू बांगर यांनी याबाबत अधिसूचना जारी केली आहे.

असे आहेत वाहतुकीमधील बदल-

अधिसूचनेनुसार, व्हीव्हीआयपी आणि व्हीआयपी पास असलेली वाहने तसेच आपत्कालीन सेवा वाहनांना स्टेडियमच्या बाजूला असलेल्या पुणे-मुंबई एक्सप्रेस वेच्या सर्व्हिस रोडवरून स्टेडियमकडे जाण्याची परवानगी असेल.

मुंबईकडून येणाऱ्या वाहनांना एक्स्प्रेस वेच्या देहू रोडच्या बाहेरून डावीकडे जावे लागेल आणि मामुर्डी गावाच्या पुढील सर्व्हिस रोडचा वापर करावा लागेल.

द्रुतगती मार्गावर जाणाऱ्या वाहनांना किवळे पुलानंतर मुकाई चौकात यू-टर्न घ्यावा लागेल आणि त्यानंतर सिम्बायोसिस कॉलेजच्या बाजूने सर्व्हिस रोडचा वापर करावा लागेल.

जुना पुणे-मुंबई महामार्ग वापरणाऱ्या वाहनांना सेंट्रल चौकातून यू-टर्न घ्यावा लागेल आणि नंतर साई नगर फाटा मार्गे स्टेडियमवर जावे लागेल. या वाहनांना सोमाटणे फाटामार्गे मामुर्डी अंडरपासकडे येण्यास मनाई करण्यात आली आहे.

वाहतुकीमधील बदल-

पुण्याकडून येणाऱ्या वाहनांनी पुणे-बेंगळुरू महामार्गावरून यावे. किवळे पुलावर पोहोचल्यानंतर ही वाहने डावीकडे जातील आणि नंतर एक्स्प्रेस वेच्या डाव्या बाजूच्या सर्व्हिस रोडने स्टेडियमवर जातील.

निगडीकडून येणारी वाहने रावेत चौक, भोंडवे चौक, मुकाई चौक या दिशेने जातील आणि नंतर एक्स्प्रेस वेच्या डाव्या बाजूच्या सर्व्हिस रोडने स्टेडियमवर जातील. (हेही वाचा: IND vs ENG 4th T20I Head to Head: भारत आणि इंग्लडं यांच्याच रंगणार चौथा टी-20 सामना, आकडेवारीत पाहा कोण आहे वरचढ)

मामुर्डी ते कानेटकर बंगला आणि मामुर्डी ते गहुंजे दरम्यानचा रस्ता, कृष्णा चौक ते मामुर्डी अंडरपास मार्गे आणि जुना पुणे-मुंबई महामार्ग ते एमसीए स्टेडियम मार्गांवर दुपारी 3  ते मध्यरात्रीपर्यंत अवजड वाहनांना प्रवेश बंदी.

दरम्यान, या सामन्यादरम्यान पुण्यात वाढत असलेल्या गुइलेन-बॅरे सिंड्रोमच्या र्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेतली जात आहे. चाहत्यांना मोफत स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. स्टेडियममधील पाण्याची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी ते तीन वेळा फिल्टर केले जाणार आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jan 30, 2025 04:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).