Martyrs' Day 2025 HD Images

Martyrs' Day 2025 HD Images in Marathi: भारतामध्ये दरवर्षी 30 जानेवारी रोजी ‘हुतात्मा दिन’ (Martyrs' Day 2025) पाळला जातो. हा दिवस म्हणजे महात्मा गांधी यांची पुण्यतिथी (Mahatma Gandhi Death Anniversary) होय. राष्ट्रपित्याच्या पुण्यतिथीच्या स्मरणार्थ देशासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना या दिवशी आदरांजली अर्पण केली जाते. हा दिवस ‘शहीद दिन’ म्हणूनही ओळखला जातो. नथुराम गोडसेने 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधींची हत्या केली. हा दिवस महात्मा गांधी यांची राष्ट्रभक्ती, त्याग आणि त्यांच्या अहिंसेच्या तत्त्वज्ञानाची आठवण करून देतो. मात्र हा दिन हा केवळ महात्मा गांधी यांची पुण्यतिथीच नसून, भारतासाठी बलिदान दिलेल्या सर्व हुतात्म्यांची आठवण करून देणारा दिवस आहे. म्हणूनच या दिवशी देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या वीरांच्या स्मृतीस वंदन केले जाते.

गांधीजी 30 जानेवारी 1948 रोजी नवी दिल्लीतील बिरला भवनमध्ये संध्याकाळी प्रार्थनेसाठी जात असताना त्यांच्यावर नथुराम गोडसेने गोळ्या झाडल्या. त्यांच्या मृत्यूनंतर, देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी 30 जानेवारी हा दिवस ‘हुतात्मा दिन’ म्हणून पाळण्यात येऊ लागला. या दिवशी दिल्लीतील राजघाट येथे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि अन्य नेते महात्मा गांधींच्या समाधीस्थळी पुष्पांजली अर्पण करतात. या दिवसानिमित्त काही Messages, Whatsapp Status, Images द्वारे देशासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना स्मृतीस अभिवादन करा. (हेही वाचा: Gandhibaba Jatra: लातूर जिल्ह्यातील उजेड गावात प्रजासत्ताक दिनानिमित्त भरते देशातील एकमेव 'गांधीबाबा जत्रा'; जाणून घ्या महात्मा गांधींना समर्पित या मेळाव्याबद्दल)

 

Martyrs' Day 2025 HD Images
Martyrs' Day 2025 HD Images
Martyrs' Day 2025 HD Images
Martyrs' Day 2025 HD Images
Martyrs' Day 2025 HD Images

दरम्यान, या दिवशी महात्मा गांधी यांच्या विचारांवर व्याख्याने, निबंध स्पर्धा आणि चर्चासत्रे आयोजित केली जातात. भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाकडून हुतात्म्यांना मानवंदना दिली जाते. पोलीस आणि सुरक्षा दल आपले वीर जवान आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतींना सलामी देतात. राष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या वीरांचे स्मरण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. तसेच तरुण पिढीला देशभक्ती, नीतिमत्ता आणि त्याग यांचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे.