
महाराष्ट्र आणि लावणी (Lavani) यांचे नाते जितके जुणे तितकेच अतूट आहे. त्यात पुन्हा लोकनाट्य आणि लावणी सादर करणाऱ्या अनेक कलावंतांनी आपले उभे आयुष्य या कलेसाठी खर्ची घातले. त्यातूनच मग अनेक नवनवे शाहीर आणि लावणीसम्राज्ञी महाराष्ट्राला मिळाल्या. दरम्यान, मधल्या काळात लावणी म्हणजे केवळ बॉलिवूड टाईप डान्स किंवा गाण्यावर नुसताच डान्स असेच समिकरण झाले होते. मात्र, कांची शिंदे यांचे लावणी (Kanchi Shinde Lavani Video) करतानाचे काही व्हिडिओ समाजमाध्यावर व्हायरल झाले आणि हे समिकरण बदलेल असा विश्वास रसिकांना वाटू लागला. अगदी काहीच तासापूर्वी कांची यांचा एक व्हिडओ युट्युबवर अपलोड करण्यात आला आहे. ज्यामध्ये त्या लावणीला साजेशी अदाकारी करताना पाहायला मिळतात.
रेकॉर्ड डान्सवर अस्सल अदाकारी करणार मात?
मधल्या काही काळात गौतमी पाटील (Gautami Patil) नामक तरुणीने महाराष्ट्रातील तरुणांचा कलेजा खलास केला होता. अर्थात गौतमी ही डान्स रेकॉर्डेड गाण्यांवर डान्स करत असे. लावणी हा साहित्य आणि नृत्यप्रकार फारसा माहित नसलेले लोक या डान्सलाच लावणी समजत होते. त्यावरुन महाराष्ट्रातील अनेक लावणी कलाकारांनी आक्षेपही नोंदवले होते. दरम्यान, कांची शिंदे नामक कलाकार लावणी क्षेत्रात अनेकांसाठी आशेचा किरण ठरु पाहात आहे.
'वाटलं होतं तुम्ही याल' लावणीस प्रेक्षकांचा प्रतिसाद
Kanchi Shinde या नावाने युट्युबवर असलेल्या चॅनलवर या कलाकाराने आपल्या एका जाहीर कार्यक्रमातील लावणी नृत्याचा व्हिडिओ अपलोड केला आहे. त्यास अवघ्या काहीच तासात लाखो व्हिव्ह्ज मिळाले आहेत. हे वृत्त लिहीपर्यंत या व्हिडिओने तब्बल 179,563 व्हिव्ह्ज मिळवले होते. शिवाय चार हजारांहून अधिक लाईक्स आणि दोनशेहूनही अधिक प्रतिक्रियाही पाहायला मिळाल्या. कांची यांच्या युट्युब चॅनलवर दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी 'वाटलं होतं तुम्ही याल' या लावणीवर नृत्य केले. ही लावणी त्यांनी 'न्यू होम मिनिस्टर' नावाच्या जाहीर कार्यक्रमात सादर केली आहे. ज्यामध्ये उपस्थित प्रेक्षकांचाही जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे.
ढोलकीचा ठेका आणि अस्सल अदाकारी
नामवंत लावणीसम्राज्ञी आणि परंपरा
महाराष्ट्रास लावणीची फार मोठी परंपरा आहे. ज्यामध्ये विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांच्यापासून आतापर्यंत अनेक कलाकारांनी लावणी नृत्य सादर केले आहे. ज्यामध्ये लक्ष्मीबाई कोल्हापूरकर, मधु कांबीकर, सुरेखा पुणेकर , राजश्री नगरकर, आरती नगरकर, छाया खुटेगावकर, माया खुटेगावकर, वैशाली परभणीकर, रेश्मा-वर्षा परितेकर यांचा समावेश आहे. कांची शिंदे हे या रांगेतील अगती अलिकडचे आणि वर्तमानकालीन नाव आहे.
सुरुवातीच्या काळात संतांच्या विराण्या, गौळणी, बाळक्रीडेचे अभंग यांतून भक्ती आणि श्रृंगार यांचा यांचा अनोखा संगम दर्शवणाऱ्या रचाना होत आणि त्या सादरही केल्या जात. मात्र, पुढे लावणीमध्ये शाहीरीही आली आणि त्यात विररसाचाही अंतर्भाव झाला. मात्र अलिकडील काही वर्षांमध्ये लावणीतील वीररस आणि भक्तीरस बाजूला झाले असून लावणीद्वारे केवळ श्रृंगार दाखवला जातो. त्यामुळे लावणीबाबत अनेक समज गैरसमज पाहायाल मिळतात. पण काही असले तरी ही अस्सल कला सामान्य रसिकांचे मनोरंजन करते हे निश्चित.