India Vs England 5th T20I Match: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर 2 फेब्रुवारीला होणार भारत आणि इंग्लड संघामध्ये पाचवा टी-20 सामना; पोलिसांनी जारी केले वाहतूक निर्बंध, पहा सविस्तर

सदर क्रिकेट सामना पाहण्याकरीता मोठया प्रमाणात प्रेक्षकांची आणि वाहनांची गर्दी होणार असल्याने, वाहतूकीची कोंडी टाळण्याकरीता, सुरक्षिततेकरिता तसेच वाहन चालकांची गैरसोय टाळण्याकरीता, सध्याच्या वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात येत आहेत.

India Vs England 5th T20I Match: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर 2 फेब्रुवारीला होणार भारत आणि इंग्लड संघामध्ये पाचवा टी-20 सामना; पोलिसांनी जारी केले वाहतूक निर्बंध, पहा सविस्तर
Photo Credit- X

भारत आणि इंग्लड संघामध्ये पाचवा टी-20 क्रिकेट सामना (India Vs England 5th T20I Match) मरीन ड्राईव्ह वाहतूक विभाग हद्दीतील, वानखेडे स्टेडियम (Wankhede Stadium) येथे 2 फेब्रुवारी 2025 रोजी खेळला जाणार आहे. सांयकाळी 5.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. सदर क्रिकेट सामना पाहण्याकरीता मोठया प्रमाणात प्रेक्षकांची आणि वाहनांची गर्दी होणार असल्याने, वाहतूकीची कोंडी टाळण्याकरीता, सुरक्षिततेकरिता तसेच वाहन चालकांची गैरसोय टाळण्याकरीता, सध्याच्या वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात येत आहेत. 2 फेब्रुवारी 2025 दुपारी 12 ते रात्री 11.55 वाजेपर्यंत काही ठिकाणी आवश्यकतेनुसार अंशत: बदल केले जाणार आहेत. याबाबत वाहतूक पोलीस उप आयुक्त (दक्षिण) यांनी माहिती दिली आहे. तसेच वानखेडे स्टेडिअम येथे पार्किंगची व्यवस्था उपलब्ध नसल्याने प्रेक्षकांनी सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेचा (विशेषत: रेल्वेचा / लोकल ट्रेनचा) वापर करावा, असे आवाहन केले आहे.

असे असतील वाहतूक बदल-

पार्किग निर्बंध-

  • 'सी' रोडवर उत्तर बाजू एन. एस. रोडच्या जंक्शनपासून ‘ई’ रोडच्या जंक्शनपर्यंत गरज भासल्यास.
  • 'डी' रोडवर एन. एस. रोडच्या जंक्शनपासून ‘ई’ रोडच्या जंक्शनपर्यंत.
  • 'ई' रोडवर 'डी' रोडच्या जंक्शनपासून 'सी' रोडपर्यंत.
  • 'एफ' रोडवर एन. एस. रोडच्या जंक्शनपासून 'ई' क्रॉसरोड जंक्शनपर्यंत.
  • 'जी' रोडवर दक्षिण बाजू एन. एस. रोडच्या जंक्शनपासून 'ई' क्रॉसरोडच्या जंक्शनपर्यंत गरज भासल्यास.
  • 'ई' क्रॉसरोडवर 'एफ' रोड जंक्शनपासून 'जी' रोडच्या जंक्शनपर्यंत
  • एन. एस. रोडवर (दक्षिण व उत्तर वाहिनी) मफतलाल बाथ सिग्नल ते एअर इंडिया जंक्शनपर्यंत
  • वीर नरीमन रोडवर (दक्षिण व उत्तर वाहीनी ) चर्चगेट जंक्शन ते सुंदरमहल जंक्शनपर्यंत.

वरील नमूद ठिकाणी वाहने पार्क केल्यास ई-चलान कारवाई करुन वाहने कर्षित करण्यात येतील.

वाहतूकीच्या मार्गातील बदल-

  • अ) 'डी' रोड हा एन.एस.रोड वरील (मरीन ड्राईव्ह) जंक्शन ते 'ई' व 'सी' रोड जंक्शनपर्यंत एक दिशा (पश्चिम-पूर्व) (One Way) मार्ग राहील.
  • ब) 'ई' रोड हा एन. एस. रोड वरील (मरीन ड्राईव्ह) जंक्शन ते 'ई' व 'सी' रोड जंक्शनपर्यंत एक दिशा (दक्षिण वाहिनी) (One Way) मार्ग राहील.Traffic Advisory For India Vs England 5th T20I Match-

वानखेडे स्टेडिअमच्या सुरळीत मार्गक्रमणाकरीता खालील सुचनांचे पालन करावे-

  • (अ) वानखेडे स्टेडिअम गेट क्रमांक 1, 2, 7 चे टिकिट असणाऱ्या प्रेक्षकांनी चर्चगेट रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर उतरुन 'डी' रोडने इच्छितस्थळी जावे.
  • (ब) वानखेडे स्टेडिअम गेट क्रमांक 4, 5(अ) चे टिकिट असणाऱ्या प्रेक्षकांनी मरीन लाईन्स रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर उतरुन 'एफ' रोडने इच्छितस्थळी जावे.
  • क) वानखेडे स्टेडिअम गेट क्रमांक 3 चे टिकिट असणाऱ्या प्रेक्षकांनी चर्चगेट रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर उतरुन एन. एस. रोडने इच्छितस्थळी जावे. (हेही वाचा: IND vs ENG 4th T20I: उद्या पुण्यात होणार भारत आणि इंग्लंड यांच्या टी-20 मालिकेतील चौथा सामना; पिंपरी-चिंचवड पोलिसांनी जाहीर केले वाहतुकीमधील बदल, जाणून घ्या सविस्तर)
  • ड) एन. एस रोडवरुन पायी चालत येणाऱ्या प्रेक्षकांनी रोड वरुन न चालता फुटपाथचा वापर करावा.
  • इ) एन.एस रोडवरुन वाहनांनी येणाऱ्या प्रेक्षकांनी दिशादर्शक चिन्हानी दर्शविलेल्या चढ-उतार ठिकाणांचाच चढ- उतारा करीता वापर करावा.

(The above story first appeared on LatestLY on Jan 30, 2025 06:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).