Ola Electric Scooters at Maha Kumbh 2025: महाकुंभात आता ओलाची एंट्री; कमी खर्चात प्रवास करण्यासाठी उपलब्ध करून दिल्या 1,000 इलेक्ट्रिक स्कूटर्स
ओलाने प्रयागराजपर्यंत आणि शहरातील प्रवासासाठी अनेक सेवा सुरू केल्या आहेत. यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या शटल्स, परवडणाऱ्या टॅक्सी भाड्याच्या योजना, तसेच विमानतळ व रेल्वे स्थानकांवर विशेष ट्रान्झिट सुविधा समाविष्ट आहेत.
Ola Electric Scooters at Maha Kumbh 2025: उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे जगातील सर्वात मोठ्या धार्मिक मेळ्यांपैकी एक, महा कुंभ 2025 चे आयोजन केले गेले आहे. 26 फेब्रुवारी 2025 पर्यंत चालणाऱ्या या मेळ्यात सुमारे 400 दशलक्ष भाविक सहभागी होतील, असा अंदाज आहे. आता कुंभमेळ्यातील लाखो भाविकांच्या प्रवासाला सुलभ करण्यासाठी ओला आणि उबर या कंपन्यांनी विशेष वाहतूक सेवा जाहीर केल्या आहेत. ओलाने महा कुंभ 2025 साठी 1,000 इलेक्ट्रिक स्कूटर्स उपलब्ध करून दिल्या आहेत. या इको-फ्रेंडली वाहनांमुळे मेळ्याच्या विस्तृत परिसरात प्रवास अधिक सुलभ आणि परवडणारा होईल. ओलाने ‘कुंभ सहाय्याक’ नावाचे विशेष अॅप तयार केले आहे. हे अॅप वापरकर्त्यांना नेव्हिगेशन, कुंभ मेळ्याचा इतिहास, विधी, आणि आकर्षणांबद्दल माहिती देते. अनेक भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असलेल्या या अॅपमध्ये गोपनीयतेसाठी प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत.
ओलाने प्रयागराजपर्यंत आणि शहरातील प्रवासासाठी अनेक सेवा सुरू केल्या आहेत. यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या शटल्स, परवडणाऱ्या टॅक्सी भाड्याच्या योजना, तसेच विमानतळ व रेल्वे स्थानकांवर विशेष ट्रान्झिट सुविधा समाविष्ट आहेत. (हेही वाचा: Kia Syros Unveiled in India: किआने भारतात सादर केली प्रीमियम 7-सीटरची लक्झरी SUV सिरोस; जानेवारी 2025 पासून बुकिंग सुरू, जाणून घ्या फीचर्स)
Ola Electric Scooters at Maha Kumbh 2025:
महाकुंभ में परिवहन के लिए इस्तेमाल होंगे ओला इलेक्ट्रिक के 1,000 इलेक्ट्रिक स्कूटर्स#MahaKumbh2025 #ElectricVehicles #OlaElectric #Uber @OlaElectric @bhash https://t.co/09juZn8IEF
— Gadgets360 Hindi (@gadgetshindi) January 21, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 22, 2025 04:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

