Bengaluru Shocker: पालकांनी फोन काढून घेतल्याच्या रागातून 13 वर्षीय मुलाने केली आत्महत्या; राहत्या घरी घेतला गळफास
मुलाने जेव्हा गळफास घेतला तेव्हा त्याची बहीण हॉलमध्ये टीव्ही पाहत होती. मुलाने गळफास घेतला मात्र त्यानंतर दोरी तुटली व तो खाली पडला. परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
बेंगळुरू येथे पालकांनी मोबाईल काढून घेतला म्हणून 13 वर्षीय हायस्कूलच्या विद्यार्थ्याने मंगळवारी रात्री त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. मुलाचा मोबाइल काढून घेतल्याने तो नाराज झाल्याचे पालकांनी सांगितले. मुलाची आई कपड्यांच्या कारखान्यातून घरी परतली तेव्हा, तिला मुलाने गळफास लावल्याचे दिसले. त्यावेळी मुलगा फरशीवर बेशुद्ध होऊन पडला होता व त्याच्या गळ्यात तुटलेली दोरी होती. त्यानंतर शेजाऱ्यांच्या मदतीने तिने त्याला जवळच्या रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मुलाचे वडील बेकरीमध्ये काम करतात. मुलाने जेव्हा गळफास घेतला तेव्हा त्याची बहीण हॉलमध्ये टीव्ही पाहत होती. मुलाने गळफास घेतला मात्र त्यानंतर दोरी तुटली व तो खाली पडला. परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. एका तपास अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली. माहितीनुसार, मुलगा सतत फोन वापरत असल्याने त्याच्या पालकांनी दोन दिवसांपूर्वी त्याच्याकडून फोन काढून घेतला होता. याच रागातून मुलाने आत्महत्या केल्याचा संशय आहे. (हेही वाचा: Andhra Pradesh Crime: विम्याचे पैसे मिळण्यासाठी बहिणीची हत्या; आंध्र प्रदेशमधून रिअल इस्टेट एजंटला अटक)
पालकांनी फोन काढून घेतल्याच्या रागातून 13 वर्षीय मुलाने केली आत्महत्या-
Reportedly upset after his parents took away his mobile, a 13-year-old high school student died by suicide in his residence off Magadi Road. The incident came to light when the boy's mother returned home from the garment factory and found him lying unconscious on the floor of the… pic.twitter.com/46dlaMlmoa
— The Times Of India (@timesofindia) January 30, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 30, 2025 10:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

