Raj Thackeray On Chhaava: 'छावा' चित्रपटातील 'लेझीम नृत्या' चा सीन का हटवायला सांगितले? राज ठाकरे यांनी केलं स्पष्ट

छावा हा हिंदी सिनेमा छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर बेतलेला आहे. या सिनेमात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची प्रमुख भूमिका साकारत आहे तर रश्मिका मंदाना येसूबाईंच्या भूमिकेत आहे.

Raj Thackeray On Chhaava: 'छावा' चित्रपटातील 'लेझीम नृत्या' चा सीन का हटवायला सांगितले? राज ठाकरे यांनी केलं स्पष्ट
Raj Thackeray On Chhaava | You Tube

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' (Chhaava) चित्रपट आता रीलीज साठी सज्ज आहे. या सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रीलीज झाला आणि एक नवा वाद सुरू झाला आहे. सिनेमामध्ये संभाजी महाराजांची (Chhatrapati Sambhaji Maharaj) भूमिका साकारणारा अभिनेता विकी कौशल 'लेझीम नृत्य' करताना दिसत आहे. या लेझीमनृत्यावर काही छत्रपती संभाजी महाराज प्रेमींनी आपला आक्षेप नोंदवला होता. त्यावरून वातावरण गरम असताना लक्ष्मण उतेकर यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. राज ठाकरेंनी देखील लेझीम नृत्याचा सीन हटवण्यास सांगितलं आहे.

लेझीम नृत्याचा सीन का हटवला?

लक्ष्मण उतेकर यांनी राज ठाकरेंच्या भेटीनंतर हा लेझीम नृत्याचा सीन हटवणार असल्याचं म्हटलं आहे. राज ठाकरेंनी या भेटीबद्दल बोलताना 'आजकाल सार्‍यांनाच वाटतं आपल्याला इतिहास समजतो. अनेकांच्या भावना उफाळून येतात. इतिहासाच्या पानांमध्ये कदाचित छत्रपती संभाजी महाराजांनी लेझीम हातात घेतली असल्याचा उल्लेख नसेल पण मनात असं शकतं. लेझीम नृत्य हा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. त्यात वावगं काही नाही. कदाचित त्यांनी हातात घेतली पण असेल. पण जर सिनेमात केवळ सेलिब्रेशनचा भाग म्हणून हे नृत्य असेल तर ते काढा उगाच त्यावरून चांगला चित्रपट दावणी वर कशाला लावायचा? असं राज ठाकरे म्हणाले आहे. जर सिनेमाची काहाणी त्यावरून पुढे सरकत नाही तर तो काढता येऊ शकतो असं ते म्हणाले आहेत.

दरम्यान राज ठाकरे यांनी प्रत्येक मराठी माणसाने 'छावा' सिनेमा पहावा असं राज ठाकरे म्हणाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आपली प्रेरणा आहे पण संभाजी महाराज आपलं बलिदान आहे. त्यामुळे तो बघितला पाहिजे. Chhava Trailer Out: संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशल चमकला, 'छावा'चा ट्रेलर प्रदर्शित .

सिनेमा पाहताना रसिक औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांनी केलेला अत्याचार मनात ठेवून जाणार मग अशावेळी ट्रेलर मध्ये ते लेझीम नृत्य करताना योग्य वाटत नसल्याचं राज ठाकरे म्हणाले आहेत.

 

(The above story first appeared on LatestLY on Jan 30, 2025 02:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).