Anand Paranjpe and Rajan Vichare (Photo Credits: Facebook)

Thane Lok Sabha Constituency Election Results 2019: लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections 2019) साठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु झाली असून, निकालही हाती येण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघांपैकी एक असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघ आणि या मतदारसघातील उमेदवारांचे मताधिक्यही हाती येत आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार आनंद परांजपे (Anand Paranjpe)आणि शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे (Rajan Vichare) यांच्यात लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections 2019) साठी जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. दरम्यान, एक्झिट पोल्सनी भाजप-शिवसेना युतीला अनुकूल तर, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला प्रतिकूल अंदाज दर्शवले आहेत. या पार्श्वभूमीवर हाती येत असलेली निकालाची आकडेवारी उत्सुकता वाढवणारी आहे.

जाणून घ्या महाराष्ट्रासह संपूर्ण भारताचा निकाल एका क्लिकवर, पाहा लाइव अपडेट्स

राज्यातील 48 मतदारसंघांपैकी ठाणे हा सर्वात मोठा मतदार संघ आहे. यातील मतदारांची संख्या एकूण 23 लाख 7 हजार 232 आहे. महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान झाले त्यात चौथ्या टप्प्यात ठाणे मतदारसंघातील मतदान पार पडले. ठाण्याचा किल्ला राखण्यात शिवसेनेला कायमच यश मिळाले. यंदा निवडणूकांमध्ये अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने आनंद परांजपे यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे यंदाही शिवसेनेला हा किल्ला जिंकण्यात यश येणार का?  हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, या वेळी लोकसभा निवडणूक 2019 साठी शिवसेनेच्या तिकीटावर राजन विचारे तर राष्ट्रवादी काँग्रेस तिकीटावर आनंद परांजपे तर, वंचित बहुजन आघाडी तिकीटावर मल्लिकार्जून पुजारी निवडणूक रिंगणात आहेत. शिवसेनेचा अभेद्य किल्ला असणाऱ्या ठाणे मतदारसंघात या वेळी मतदार आपला कौल कोणाच्या बाजूने देणार याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.