Python | Representational image (Photo Credits: pxhere)

ठाणे वनविभागाने (Thane Forest Department) कारवाई करत पोलिसांकरवी एका व्यक्ती अटक केली आहे. भलामोठा अजगर (Python Handling) बेकायदेशीररित्या हाताळ्याचा त्याच्यावर आरोप आहे. ग्राउंड-प्लस-वन स्ट्रक्चर असलेल्या इमारतीच्या खिडकीवर एक साप लटकत होता. या व्यक्तीने तो साप चुकीच्या पद्धतीने पकडला. तो साप बाहेर काढल्यावर तो साप नसून मोठा अजगर असल्याची पुष्टी झाली. तो साप अजगर (Python ) असल्याची पुष्टी होऊनही हा इसम त्याला हाताळत होता. या घटनेचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओ आढळून आल्यानंतरच पोलिसांनी या व्यक्तीवर गुन्हा दाखल करुन कारवाई केली. हा व्हिडिओ भायकळा येथील असल्याची पुष्टी करण्यात आली आहे.

साधारण 27 सप्टेंबर रोजी सोशल मीडियावर व्हिडिओव्हायरल झाला. ज्यात इमारतीच्या खिडकीला एक अजगर बाहेरच्या बाजूने लटकत असताना पाहायला मिळते. हा अजगर एक व्यक्ती चुकीच्या पद्धतीने पकडतो आहे त्याला बेकायदेशीरपणे हाताळतो आहे असेही व्हिडिओत दिसते. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वन विभागाने घटनेची नोंद घेऊन तपास सुरु केला. वन विभागाला आढळून आले की, हा व्यक्ती पकडत असलेला साप नसून तो अजगर आहे. अधिकाऱ्यांनी तातडीने या व्यक्तीविरोधात वन्यजी संरक्षण कायदा 1972 (सुधारणा 2022) कलम क अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर व्यक्ती भायकळा येथील असल्याचे समजते.

अधिक माहिती अशी की, भायकळा येथील असलेल्या या आरोपीचे नाव योगेश पन्हाळे असे आहे. त्याच्या विरोधात भारतीय वन्यजीव कायदा 1972 (सुधारणा 2022) कलम 9,39,44,48,48 (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मीड-डे डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, त्याला 27 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावून अटक केल्याचे समजते. त्याला मेट्रोपोलीन मॅजिस्ट्रेत 46 व्या कोर्टात हजर करण्यात आले असता त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. ही कारवाई ठाणे उपवनसंरक्षक संतोष सस्ते, सहायक वनसंरक्षक सोनल वळवी, परिक्षेत्र वन अधिकारी राकेश भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या प्रयत्नात दादरचे वनपाल हर्षल साठे, वन कर्मचारी बबन चव्हाण यांचाही सहभाग होता.

माणसाने वन्य प्राण्यांच्या अधिवासात अतिक्रमण केल्याने नागरी वसाहतींमध्ये वन्यजीव आणि सापांसारखे सरपटणारे प्राणी मोठ्या प्रमाणावर दाखल होतात. अलिकडील काळात मुंबईसारख्या शहरामध्ये साप आणि इतर अजगर आढळून येण्याच्या घटना वाढल्या आहेत. अनेक नागरिक हे साप, अजगर बेकायदेशीररित्या पकडतात. त्यांच्याकडे साप, अजगर पकडण्याचे कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण नसते. परिणामी अशा लोकांवर वन विभागाकडून कारवाई केली जाते.