ठाण्यात एका 44 वर्षीय महिलेने कोविड19 ची चाचणी केली असता तिला दोन परस्पर विरोधी असे रिपोर्ट्स देण्यात आले. मात्र या महिलेने तिसऱ्या वेळेस जेव्हा कोरोनाची चाचणी केली असता ती निगेटिव्ह आल्याने आर पवार आणि तिच्या परिवाराला दिलासा मिळाला आहे. महिलेला ठाण्यातील महापालिकेच्या रुग्णालयात परिवाने जबरदस्तीने चाचणी करण्यास सांगतिले. या महिलेने प्रथम चाचणी ठाणे महापालिका रुग्णालयात केली असता ती पॉझिटिव्ह दाखवले. त्यानंतर खासगी लॅब मध्ये केली असता ती निगेटिव्ह आली.(Lockdown in Thane: ठाणे राहणार आणखी 7 दिवस बंद; TMC परिसरात 12 जुलै 2020 ते 19 जुलै दरम्यान लॉक डाऊन जाहीर)
एका सामाजिक कार्यकर्त्याने याची दखल घेत खोटे रिपोर्ट्स देऊन लोकांच्या मनात भीती निर्माण करण्यासह कशा पद्धतीने कोविडच्या रुग्णांना उपचार दिले जातात याबाबत खुलासा केला आहे. पवार परिवाराने असे म्हटले ही महिलेला कोविडच्या येथे ठेवण्यासह नवी चाचणी ही केली. तसेच क्वारंटाइन करण्यासह तिची आणखी एक चाचणी करण्यात आली. महापालिका उपायुक्त संदीप मालवी यांनी असे सांगितले की, चाचणी करण्यामध्ये चुक झाली असून 5 टक्के कुठेतरी चुक होणारच असे स्पष्टीकरण ही त्यांनी दिले आहे.(Lockdown In Kalyan-Dombivali: कल्याण-डोंबिवलीत येत्या 19 जुलै पर्यंत लॉकडाऊन कायम राहणार, KDMC महापालिकेचे आदेश)
दरम्यान, ठाण्यात कोरोनाबाधितांचा आकडा 61869 वर पोहचला असून 1646 जणांचा बळी गेला आहे. तर 26489 कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती सुधारली आहे. तर ठाण्यात कालपासून ते येत्या 19 जुलै पर्यंत पुन्हा लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. या लॉकडाऊनच्या काळात फक्त कामावर जाणाऱ्या व्यक्तींना परवानगी असणार आहे. याआधी पुणे, औरंगाबाद, नांदेड याठिकाणी लॉक डाऊनची घोषणा करण्यात आली आहे.