Lockdown In Kalyan-Dombivali: कल्याण-डोंबिवलीत येत्या 19 जुलै पर्यंत लॉकडाऊन कायम राहणार, KDMC महापालिकेचे आदेश
Kalyan Dombivli Municipal Corporation | (Photo Credit: Archived, Edited And Representative images)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. त्यामुळे चिंता तर व्यक्त करण्यात येत आहे. परंतु दुसऱ्या बाजूला राज्यात अनॉलकची प्रक्रिया सुरु करण्यात आल्यानंतर प्रचंड प्रमाणात कोविडच्या रुग्णांची संख्या दिवसागणिक अधिक होत चालली आहे. याच कारणास्तव आता कोरोनाच्या हॉटस्पॉट ठिकाणी पुन्हा लॉकडाऊनचे आदेश जाहीर करण्यात आले आहे. पुणे, ठाणे, मुंबई आणि नवी मुंबईत कोरोनाच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे.  दरम्यान आता कल्याण-डोंबिली (Kalyan-Dombivali) महापालिकेने सुद्धा लॉकडाऊन वाढवण्यात येणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे.(Lockdown in Thane: ठाणे राहणार आणखी 7 दिवस बंद; TMC परिसरात 12 जुलै 2020 ते 19 जुलै दरम्यान लॉक डाऊन जाहीर)

कल्याण-डोंबिवलीत वाढत्या कोरोनाबाधितांचा आकडा पाहता येत्या 19 जुलै पर्यंत लागू करण्यात आला आहे. याबाबत केडीएमसी कमिशनर विजय सुर्यवंशी यांनी अधिक स्पष्ट केले आहे. कल्याण डोंबिवलीत कोरोनाबाधितांचा आकडा 10 हजारांच्या पार गेला आहे. कल्याण-डोंबिवलीत कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत चालल्याने नागरिक चिंतेत पडले आहेत. (Lockdown In Pune: पुण्यात येत्या 13-23 जुलै दरम्यान लॉकडाऊन जाहीर, पहिल्या टप्प्यात 'या' गोष्टी सुरु राहणार)

दरम्यान, महाराष्ट्रात कालच्या दिवसभरात कोरोना बाधितांच्या संख्येत 6,875 नवीन रुग्णांची वाढ झाली, यानुसार राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा आता 2,30,599 वर पोहचला आहे. याशिवाय कालच्या दिवसात मृत्यू झालेल्या 219 रुग्णांसहित कोरोना मृतांची संख्या सुद्धा 9,667 इतकी झाली आहे. राज्यात आतापर्यंत 1,27,259 रुग्ण बरे झाले आहेत. तर सध्या 93,652 सक्रीय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.