Lockdown In Pune: पुण्यात येत्या 13-23 जुलै दरम्यान लॉकडाऊन जाहीर, पहिल्या टप्प्यात 'या' गोष्टी सुरु राहणार
Shekhar Gaikwad, Commissioner, Pune Municipal Commission (Photo Credits-ANI)

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढ होत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात असून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे आणि नवी मुंबईत कोरोनाच्या सर्वाधिक रुग्णांची संख्या आहे. याच दरम्यान, आता पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. पुण्यात येत्या 13-23 जुलै दरम्यान लॉकडाऊन कायम राहणार आहे. मात्र हा लॉकडाऊन दोन टप्प्यात असणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तर पहिल्या टप्प्यात काही गोष्टी सुरु करण्यास महापालिकेने परवानगी दिली आहे.

पुण्याचे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी लॉकडाऊन बाबत अधिक माहिती दिली आहे. गायकवाड यांनी असे म्हटले आहे की, लॉकडाउनच्या पहिल्या टप्प्यात म्हणजेच 13 ते 18 जुलै दरम्यान मेडिकल शॉप, डेअरी, रुग्णालये सुरु राहणार आहेत. तसेच अत्यावश्यक सेवासुविधांसह वृत्तपत्र विक्रीस परवानगी असणार आहे.(Lockdown In Pune: पुण्यात येत्या सोमवार पासून 15 दिवस कडकडीत बंद; पालकमंत्री अजित पवार यांची घोषणा)

पुण्यातील एकूण 22 गावात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. पुण्याव्यतिरिक्त पिंपरी-चिंचवड परिसर, कंन्टेंटमेंट परिसराचा सुद्धा लॉकडाऊनमध्ये समावेश असणार असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले आहे.