Lockdown (संग्रहित संपादित प्रतिमा)

पुणे (Pune) जिल्ह्यात कोरोना रुग्णांची (Coronavirus In Pune) संख्या दिवसागणिक वाढत असताना आता या व्हायरस ला रोखण्यासाठी येत्या सोमवार पासुन म्हणजेच 13 जुलै पासुन पुढील 15 दिवस कडकडीत बंद लागु केला जाणार आहे. याबाबत उपमुख्यमंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी माहिती दिली आहे. मुंबईनंतर सर्वाधिक करोनाबाधित जिल्हा म्हणून महाराष्ट्रात पुण्याचा क्रमांक आहे. सुरुवातीला पुणे शहर व पिंपरी-चिंचवड (Pimpari Chinchwad) इथेच कोरोना रुग्ण मर्यादित होते मात्र आता ग्रामीण भागातही कोरोना पसरू लागला आहे. आतापर्यंत पुण्यात 34 हजार 582 जणांना करोनाची लागण झाली आहे. तर, 979 जणांचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली होती.

प्राप्त माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्री पासून पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात येईल. यावेळी अत्यावश्यक सेवा सुरु असतील तसेच कंटेनमेंट क्षेत्र वगळता बाकी भागात नियम शिथिल असतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी यासंदर्भात चर्चा झाल्याचे सुद्धा अजित पवार यांनी सांगितले आहे. औरंगाबाद मध्ये कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी आजपासून कडक लॉकडाऊन लागू

४८ तासात २२२ Police कर्मचाऱ्यांना Corona ची लागण; ठाणे शहरात ७२% Police कोरोनामुक्त - Watch Video

 

दरम्यान, राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा आता 2,30,599 वर पोहचला आहे. याशिवाय कोरोना मृतांची संख्या सुद्धा 9,667 इतकी झाली आहे. राज्यात आतापर्यंत 1,27,259 रुग्ण बरे झाले आहेत. तर सध्या 93,652 सक्रीय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत