Glamanand Miss Teen 2019 स्पर्धेत  ठाण्याच्या किंजल विवेक कावलकरचा 'ब्यूटी हाई मिस मल्टी मीडिया' पुरस्काराने गौरव
Kinjal Kawalkar (File Photo)

ग्लामानंद मिस टिन इंडिया 2019 या स्पर्धेमध्ये टॉप 10 मध्ये ठाण्याच्या किंजल विवेक कावलकर (Kinjal Kawalkar) हीने नामांकन मिळवले आहे. जयपुर येथे जयबाग महालात या भव्य सोहळ्यात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये किंजलचा गौरव करण्यात आला आहे. किंजल ही 17 वर्षीय असून सध्या मेडिकळ एन्ट्रेसची तयारी करत आहे. तिची निवड 'ब्यूटी हाई मिस मल्टी मीडिया' (Beauty  High Miss Multimedia)   म्हणून  झाली आहे.

ठाणे येथील प्रसिद्ध डॉ. वीणा कावलकर आणि आर्थोपेडिक सर्जन डॉ. विवेक कावलकर यांची मुलगी आहे. किंजल ही केंद्रीय विद्यालय एअर फॉर्स सी बी ए सी विज्ञान 85% मार्क नी उतिर्ण विद्यार्थी आहे. सध्या किंजल एमबीबीएसची तयारी करत आहे.

किंजलच्या घरातच वैद्यकीय क्षेत्राचा वारसा आहे. किंजलचा भाऊ कपिल औरंगाबाद मेडिकल एमबीबीएसचा विद्यार्थी आहे. या सोहळ्यात ग्लामानंद चे प्रमुख श्री .निखिल आनंद , डॉ. त्वचा ठाणेचे डॉ. अमित कारखानिस मुख्य परीक्षक, डायरेक्टर श्री योगेश मिश्रा, यानी किंजलला पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या नामांकनाने गौरवण्यात आले आहे.