राज्यात 12 वीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे, मात्र कनिष्ट महाविद्यालयातील प्राध्यापकांनी पेपरतपासणीवर बहिष्कार टाकला आहे. आपल्या प्रलंबित मागण्या मान्य करा अन्यथा आम्ही पेपर तपासणार नाही असा इशारा शिक्षकांनी दिला आहे. त्यामुळे आता परत एकदा 12 विचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. सध्या तब्बल 30 लाख उत्तरपत्रिका तपासणीविनाच पडून आहेत. बारावीचे इंग्रजी, मराठी, हिंदी, उर्दू या विषयांचे पेपर झाले आहेत. आता प्रत्येक पेपर झाल्यावर त्यात 15 लाखांची भर पडणार आहे.
शिक्षक महासंघाची आपल्या मागण्यासाठी शिक्षणमंत्र्यांसोबत 20 फेब्रुवारी रोजी बैठक झाली होती. यावेळी शिक्षकांच्या मागण्या मान्य करण्यात आल्याने हे आंदोलन मागे घेतले होते. मात्र जो पर्यंत शासन लेखी आदेश काढत नाही आणि अर्थ विभागाकडे असलेल्या मागण्यांवर निर्णय होत नाही तोपर्यंत उत्तरपत्रिका तपासणार नसल्याचे शिक्षकांनी सांगितले आहे. तसेच पेपर झालेल्या विषयांच्या चीफ मॉडरेटर व मॉडरेटर बैठका झाल्या नाहीत. असहकार आंदोलन सुरू असेपर्यंत बैठक घेणार नाही असे शिक्षण मंडळाला कळवण्यात आले आहे. (हेही वाचा: मेगाभरतीनंतर राज्यात ‘शिक्षक भरती’ची घोषणा; पाहा कोणत्या इयत्तांसाठी किती आहेत रिक्त जागा)
अर्थमंत्र्यांनी 26 नोव्हेंबर रोजी बैठकीला बोलावले आहे. मात्र या बैठकीत काही सकारात्मक तोडगा निघाला नाही, तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार 5 जूनआधी बारावीचा निकाल लागणे बंधनकारक आहे. या मागण्या मान्य न झाल्यास निकालाची डेडलाइन हुकल्यास त्यास सर्वस्वी सरकार जबाबदार असेल.