तारापूर येथील कारखान्यातील अपघातांची मालिका जणू संपतच नाहीय असच चित्र दिसतय. सोमवारी मध्यरात्री तारापूरच्या औद्योगिक क्षेत्रातील करिगो ऑर्गेनिक्स या रासायनिक कारखान्यात भीषण स्फोट झाल्याची बातमी समोर येतेय. ह्या स्फोटाचे स्वरुप इतके भीषण होते की, ह्या स्फोटाने येथील 5 किमीपर्यंतचा परिसर हादरला. या स्फोटात 4 कामगार जखमी झाले आहेत.
तारापूर क्षेत्रातील प्लॉट एन 154 येथील करिगो ऑर्गेनिक्स या रासायनिक कारखान्यात सोमवारी रात्री 12 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास भीषण स्फोट झाला. ह्या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याचे सांगण्यात येतेय. तसेच या स्फोटात 4 कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांना ताबडतोब जवळील रुग्णालयात हलविण्यात आले. हा स्फोट नेमका कशामुळे याचा पोलीस शोध घेत आहेत.
पालघर: तारापूर येथील एमआयडीसी मध्ये वायुगळती झाल्याने तीन कामगारांचा मृत्यू
काही दिवसांपूर्वी पालघर (Palghar) जिल्ह्यातील तारापूर(Tarapur) एमआयडीसी मधील केमिकल कंपनीमध्ये रासायनिक प्रक्रिया सुरु असताना वायुगळती झाल्याने तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला होता. तसेच तेथील डॉक्टरांनाही वायुगळतीचा त्रास होऊन त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आले होते.