पालघर: तारापूर येथील एमआयडीसी मध्ये वायुगळती झाल्याने तीन कामगारांचा मृत्यू

पालघर (Palghar) जिल्ह्यातील तारापूर (Tarapur) एमआयडीसी मधील केमिकल कंपनीमध्ये रासायनिक प्रक्रिया सुरु असताना वायुगळती झाल्याने तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे.

पालघर: तारापूर येथील एमआयडीसी मध्ये वायुगळती झाल्याने तीन कामगारांचा मृत्यू
Representational Image | (Photo Credits: PTI)

पालघर (Palghar) जिल्ह्यातील तारापूर (Tarapur) एमआयडीसी मधील केमिकल कंपनीमध्ये रासायनिक प्रक्रिया सुरु असताना वायुगळती झाल्याने तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तेथील काही डॉक्टरांना सुद्धा वायूची गळती झाल्याने त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरु आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तारापूर औद्योगिक क्षेत्रामधील एस्क्वायर केमिकल रासायनिक प्रक्रिया करताना वायुगळती झाली. त्यावेळी तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे. या कामगारांना तुंगा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.(Palghar Earthquake Tremors: पालघर, डहाणू, तलासरी भागात पुन्हा भूकंपाचे धक्के; रात्रीपासून 3 वेळा हादरला परिसर)

तर काही रुग्णांनासुद्धा या वायुगळतीमध्ये सापडलेल्या कामगारांचा त्रास जाणवू लागला. तसेच उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर आता अतिदक्षता कक्षात सुरु असल्याचे सांगितले जात आहे.

(The above story first appeared on LatestLY on May 12, 2019 07:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).