Palghar Earthquake Tremors 12 May: पालघरमध्ये (Palghar) मागील काही महिन्यांपासून भूकंपाचे धक्के जाणवत होते. आता काल (11 मे) रात्रीपासून आज पुन्हा भूकंपाचे धक्के (Earthquake Tremors) जाणवायला सुरूवात झाली आहे. काल रात्री नंतर आज सकाळी सात वाजता देखील पालघर, तलासरी,डहाणू या भागामध्ये भूकंपाचे धक्के जाणवायला सुरूवात झाली आहे. मागील काही तासात या भागामध्ये 3 भूकंपाचे जाणवले आहेत. काही महिन्यापूर्वी पालघरमध्ये एका दिवसात 6 भूकंपाचे धक्के बसले होते. यामध्ये सुरक्षेचा उपाय म्हणून घराबाहेर पडताना एका चिमुकलीचा जीव गेला होता.
पालघरला भूकंपाचे धक्के
Earthquake of Magnitude:2.6, Occurred on:12-05-2019, 07:42:39 IST, Lat:20.0 N & Long: 72.8 E, Depth: 5 Km, Region:Palghar, Maharashtra pic.twitter.com/Epl3tHTTbE
— India Met. Dept. (@Indiametdept) May 12, 2019
सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तर अनेक लोकांनी पालघर, डहाणू, तलासरी भागातून इतर ठिकाणी स्थलांतराचा निर्णय घेतला आहे. 1 मार्च दिवशी पालघर मध्ये सर्वाधिक रिश्टल स्केलचा म्हणजे 4.3 चा भूकंपाचा धक्का बसला होता.