प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फाइल इमेज)

Palghar Earthquake Tremors: शुक्रवारी (1 फेब्रुवारी) पालघर, तलासरी, डहाणू या भागात एकाच दिवसात पाच वेळा भुकंपाचे हादरे बसले होते. यामुळे स्थानिक नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण होऊन जिल्ह्याला बसलेल्या हादरांमुळे चिंता वक्त करत होते. अशा स्थितीत काल भुकंपाच्या हादराने घाबरुन घराबाहेर पळत सुटटेल्या चिमुरडीचे डोके मोठ्या दगडावर आपटून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

वैभवी भुयाळ (2 वर्ष) असे या मुलीचे नाव आहे. तर पालघर जिल्ह्याला बसलेल्या भूकंपाच्या हादरामुळे मृत्यू झाल्याची ही पहिली घटना आहे. तसेच जिल्ह्यातील घरांना तडे गेले आहेत.डहाणू येथे वारंवार भूकंपाचे हादरे बसत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दोन महिन्यातील सर्वात मोठा 4.48 रिश्टर स्केलचा धक्का असल्याचे सांगितले जात आहे.(हेही वाचा-Palghar Earthquake Tremors: सकाळपासून पालघर 5 वेळा भूकंपाच्या धक्क्याने हादरलं, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण)

Palghar Earthquake Tremors (Photo Credits -Twitter)

काल सकाळी 6.58 मिनिटांनी, 10.03 मिनिटांनी आणि 10.29 मिनिटांनी पालघर भूकंपाच्या धक्क्याने हादरलं. या भूकंपाची तीव्रता 3 ते 3.5 असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर दुपारी 2.10 मिनिटांनी चौथा धक्का बसला. तसेच चारच्या सुमारास पाचवा भूकंपाचा धक्का जाणवला होता. मात्र शनिवारी सकाळीसुद्धा 6 वाजून 58 मिनिटांनी पुन्हा भुकंपाचा पहिला धक्का बसला असून डहाणूकरांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.