Sushant Singh Rajput Case: मुंबईमध्ये Rhea Chakraborty, Samuel Miranda च्या घरी  NCB टीमचे NDPS Act अंतर्गत छापे
NCB Team In Mumbai| Photo Credits: Twitter/ ANI

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी ( Sushant Singh Rajput Case) मुंबईमध्ये तपास सुरू आहे. यात ड्रग्सच्या अनुषंगाने तपास करण्यासाठी Narcotics Control Bureau काम करत आहे. दरम्यान त्यांच्याकडून आज (4 सप्टेंबर) सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) आणि सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा (Samuel Miranda) यांच्या घरी छापे टाकण्यात आले आहे. रिया आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती (Showik Chakraborty) यांचा ड्रग्जशी काही संबंध अअहे का? याची सध्या तपासणी केली जात आहे. दरम्यान एक टीम रियाच्या घरी आणि दुसरी टीम सॅम्युअल मिरांडाच्या घरी पोहचली आहे. त्यांच्यासोबत मुंबई पोलिस देखील हजर होते.

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआय, ईडी यांच्यासोबत एनसीबी ही तिसरी केंद्रीय यंत्रणा काम करत आहे. मागील काही दिवसांत ड्रग्जच्या संदर्भात चार जणांना मुंबईत अटक झाली आहे. यामध्ये रियाचा भाऊ शौविक याचा ड्रग्ज तस्करांशी काही संबंध आहे का? त्याचा तपास सुरू आहे. एनसीच्या अधिकार्‍यांनी हा नियमित तपासाचा एक भाग असून त्यासाठी दोन टीम दाखल झाल्याची माहिती देण्यात आली होती.

ANI Tweet

दरम्यान रियाच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅट्समधून ड्रग्सशी संबंधित संभाषण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर एनसीबी कडूनदेखील तपास सुरू झाला आहे. रियाचे वकील सतिश मानेशिंदे यांनी याप्रकरणी रिया चौकशीला पूर्ण सहकार्य करेल अशी प्रतिक्रिया दिली आहे.