Supriya Sule on Ajit Pawar | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Baramati Lok Sabha Constituency: संसदेत भाषणं देऊन आणि सेल्फी काढून उपयोग नसतो. त्यासाठी गावागावात फिरावं लागतं. जनतेचे प्रश्न समजून घ्यावे लागतात, अशी टीका करणाऱ्या उपमुख्यमत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. संसद हे चर्चा आणि भाषण करण्याचेच ठिकाण आहे. तिथे भाषणं करण्यासाठीच तर आम्हा लोकांना म्हणजेच खासदारांना निवडून दिले जाते. संसदेमध्ये आजवर अनेक मोठ्या लोकांनी भाषणं केली आहेत. ज्याचे संदर्भ आजही घेतले जातात. आणि कुटुंबाचंच म्हणाल तर 'फॅमेली दिल से बनती है' असं सुप्रिया सुळे यांनी ठणकावून सांगितले. या वेळी त्यांनी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या उमेदवारीवरुनही भाष्य केले.

'प्रोफेशन आणि कुटुंब याची गल्लत करत नाही'

एका सभेत बोलताना 'पवार कुटुंबाने मला एकटं सोडलं तरी तुम्ही मला एकटं सोडू नका', असे भावनात्मक उद्गार अजित पवार यांनी काढले होते. यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, तुमचं प्रोफेशन आणि कुटुंब याची गल्लत मी केव्हाही करत नाही. राजकारण हे माझं प्रोफेशन आहे. ती माझी वैचारिक लढाई आहे. जी मी लोकांसाठी लढते. कुटंबाचं म्हणाल तर केवळ पवार, सुळे हे इतकेच माझे कुटुंब मर्यादित नाही. त्याही पलिकडे माझे कुटुंब आहे. कुटुंब केवळ रक्तांच्या नात्यानी बनत नाही. 'फॅमेली दिल से बनती है' त्यामुळे जे जे माझ्यावर प्रेम करतात, माझ्याकडे प्रश्न घेऊन येतात, ज्यांचे प्रश्न मला सोडवावेसे वाटतात ते सर्वच माझ्या कुटुंबाचा भाग आहेत, असेही त्या म्हणाल्या. (हेही वाचा, Sharad Pawar on Sunetra Pawar: सुनेत्रा पवार यांच्या संभाव्य उमेदवारीवर शरद पवार यांचे भाष्य; प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत व्यक्त केले आश्चर्य)

' राजकारण हा भावलाभावलीचा खेळ नाही'

अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांची  लोकसभा निवडणूक 2024  मध्ये उमेदवारी जवळपास निश्चित आहे. त्यामळे आगामी काळात बारामतीमध्ये नणंद भावयंज असा सामना रंगणार का? असे विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, तो निर्णय बारामतीकरांनी घ्यायचा आहे. राजकारण हा भावलाभावलीचा खेळ नाही. ती जबाबदारी आहे. त्यामुळे बारामतीच्या जनतेला माझे अवाहन आहे, मला मेरीटवर निवडून द्या. संसदेमध्ये भाषणेच करायची असतात. त्यामुळेच मी संसदेमध्ये बोलते. मी केलेल्या भाषणांची दखल घेतली जाते. इथोनाल प्रकल्पाला दिलेली चालना असो की, पेटीएमचा 70 हजार कोटींचा घोटाळासुद्धा मीच संसदेत उपस्थित केला. त्यावर मीच बोलले. इतर कोणीही बोलले नाही. आणि त्यावर कार्यवाहीसुद्धा माझ्याच भाषणामुळे झाली, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. बारामतीच्या मतदारांनी मेटीटवर निवडून द्यावे. कोणताही निर्णय भावनिकरित्या घेऊ नये. कोणाला निवडून द्यायचा हा मतदारांचा अधिकार आहे. जनताच ते ठरवत असते असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.