महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2024) राज्यातील 288 जागांसाठी मतदान सुरु झाले आहे. सकाळी 7.00 वाजल्यापासून मतदार आपला मतदानाचा हक्क बाजवत आहेत. राज्याच्या राजकारणात हायहोल्या बारामती विधानसभा मतदारसंघातही (Baramati, Baramati Assembly Constituency) पवार कुटुंबीयांनी (Pawar Family) आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule), खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), त्यांची कन्या रेवती सुळे आणि श्रीनिवास पवार यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि इतर कुटुंबीयही उपस्थित होते. मतदानाच्या ठिकाणी हे सर्व कुटुंबीय एकत्रच दाखल झाले. रांगेत उभा राहून मतदान केले. या वेळची लढत पवार विरुद्ध पवार असल्याने प्रसारमाध्यमांचेही लक्ष लागून राहिले आहे. या ठिकाणी अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार असासामना आहे.
युगेंद्र पवार यांचा प्रसारमाध्यमांशी संवाद
लोकशाहीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मला जो लोकशाहीचा हक्क दिला. तोच बजाण्यासाठी मी आलो आहे. दरवर्शीच आम्ही काटेवाडी येथे मतदानासाठी येत असतो. हा लोकशाहीचा उत्सव आहे. शरद पवार यांनी बारामतीचे नाव उज्ज्वल केले आहे. तीच परंपरा पुढे घेऊन जाण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. बारामती मतदारसंघातील जनता तो विचार करेन असा विश्वास आहे, अशी भावना बारामती विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी म्हटले आहे. आज सकाळीच त्यांनी मतदारसंघात आपला मदानाचा हक्क बजावला त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या वेळी बोलताना ते म्हणाले, आम्हाला बारामतीचा विकास करायचा आहे. पण तो विकास करताना शाश्वत विकासावर आमचा भर असेल.
288 विधानसभा जागांसाठी मतदान
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती सत्ता टिकवण्यासाठी आणि महाविकास आघाडी (MVA) सत्तेत पुनरागमन करण्यासाठी परस्परांविरोधात जोरदार संघर्ष करत आहेत. सर्व 288 विधानसभा जागांवर सकाळी 7 वाजता मतदान सुरू झाले आणि संध्याकाळी 6 वाजता संपले, असे एका निवडणूक अधिकाऱ्याने सांगितले. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. (हेही वाचा, Maharashtra Vidhan Sabha Voting 2024: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी बजावला मतदानाचा हक्क; नागपूरमध्ये केले मतदान)
मतदानाचा हक्क बजावल्यानंत सुप्रिया सुळे
#WATCH | NCP-SCP MP Supriya Sule along with her family show their inked fingers after casting a vote for #MaharashtraAssemblyElections2024
NCP has fielded Deputy CM Ajit Pawar and NCP-SCP has fielded Yugendra Pawar from the Baramati Assembly constituency. pic.twitter.com/x22KuN8OEI
— ANI (@ANI) November 20, 2024
महायुती विरुद्ध महाविकासआघाडी
दरम्यान, भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस यांचा समावेश असलेली महायुती, महिलांसाठी माझी लाडकी बहिण या लोकप्रिय योजने द्वारे जनमानसावर प्रभाव टाकत सत्ता कायम ठेवण्याच्या प्रयत्नात आहे. दुसऱ्या बाजूला काँग्रेस, शिवसेना (UBT) आणि NCP (शरदचंद्र पवार) यांचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीने (MVA) भाजपचे स्टार प्रचारक उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या “बातेंगे तो काटेंगे” आणि PM मोदींच्या “एक है तो सुरक्षित है” या घोषणांमधील फोलपणा लोकांसमोर आणत मतदारांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला आहे. अंतिम क्षणी मतदार कोणाच्या पारड्यात आपले मत टाकतो, याबाबत येत्या 23 नोव्हेंबर रोजी कळणार आहे.