Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मागील महिन्याभरापासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणानी आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली. आरक्षणसाठी तरुणांचे आत्महत्या हे सत्र गेल्या महिन्यांपासून सुरुच आहे. मराठवाड्यात हे सत्र चालूच आहे. नांदेड येथील एका २५ वर्षीय तरुणाने आरक्षण मिळावे या मागणीसाठी विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर गावात मोठी खळबळ उडाली आहे.
माहितीनुसार, दाजीबा शिंदे असं नाव असलेल्या तरुणाने आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली आहे. ऐन दिवाळीत ११ नोव्हेंबरला विष प्राशन केले. घराच्यांनी त्याला रुग्णालयत दाखल केले पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दाजीबा शिंदे याच्याजवळ एक सुसाईट नोट सापडली ज्यात मराठा आरक्षण मिळत नसल्याने आत्महत्या करत असल्याचे लिहलं. पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून सुसाईट नोट जप्त केली.
दाजीबा हा अनेक वेळा मराठा आरक्षणासाठी आंदोलनात सहभागी झाला होता. दाजीबाचे पदवीचे शिक्षण पुर्ण झाले असून तो स्पर्धा परिक्षाची तयारी करत होता. वडिलांनी काही दिवसांपूर्वीच शेतजमिन विकली होती. असं कुटुंबातील सदस्यानी माहिती पोलिसांना दिली. मनोज जरांगे यांनी तरुणांना आत्महत्या करू नका असं आवाहन देत आहे. एककीडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आत्महत्या करू नका असं आवाहन तरुणांना देत आहे.