दुष्काळाच्या झळांनी होरपळून निघणार्या महाराष्ट्राला आता एसटी महामंडळ मदतीचा हात पुढे करणार आहेत. सध्या तीव्र पाणी टंचाईमुळे अनेक गावांमध्ये पिण्याचं पाणी मिळणंदेखील कठीण झालं आहे. सध्या 9 जिल्ह्यातील 19 गावं दत्तक घेऊन तेथे पाणी पुरवठा केला जाणार आहे. टॅंकरने पाणी पुरवठा केला जाणार आहे. पाणी समस्या संपेपर्यंत टॅंकरने पाणी पुरवठा केला जाणार आहे.
सामाजिक बांधिलकी म्हणून एस टी महा मंडळाने 19 गावं दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. 19 मे पासून गावांना पाणीपुरवठा करण्याचं काम सुरू झालं आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, नाशिक, सातारा, अहमदनगर, बुलढाणा येथील गावांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
निवडणूक आयोगाकडून आचार संहिता शिथील करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त भागामध्ये मदत पोहचवण्याचे काम हाती घेतले आहे.