महाराष्ट्र बोर्डाचे (Maharashtra Board) 10 वी आणि 12 वीचे निकाल लवकरच जाहीर होतील. सुट्ट्यांचा काळ संपत आल्याने आता विद्यार्थ्यांना निकालाचे वेध लागले आहेत. HSC, SSC चे विद्यार्थी MSBSHSE बोर्डाच्या ऑफिशियल वेबसाईटवर निकाल पाहू शकतात. महाराष्ट्रात HSC ची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च तर SSC ची परीक्षा 1 मार्च ते 22 मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आली होती.
यंदा दहावीचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तर बारावीचा निकाल मे महिन्याच्या अखेरीस लागण्याची शक्यता आहे.
असा पहा निकाल:
# सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर जा.
# या वेबसाईटवरील रिझल्ट लिंकवर क्लिक करा.
# त्यानंतर तुमचा सीट नंबर, रजिस्ट्रेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ इत्यादी माहिती टाकून एंटर करा.
# तुमचा निकाल स्क्रिनवर झळकेल. तो निकाल तुम्ही डाऊनलोडही करु शकता.
2018 मध्ये 10 वीचा निकाल सुमारे 89.41% आणि 12 वीचा निकाल 88.41% लागला होता.