प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

SSC, HSC Exam Result 2019: महाराष्ट्रात नुकत्याच दहावी आणि बारावी बोर्ड परिक्षा संपल्या आहेत. मात्र आता बोर्ड परिक्षेचा निकाल कधी लागणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तर 12 वीचा निकाल मे महिन्यात आणि 10 वीचा निकाल जून महिन्यात लागण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी 2018 मध्ये दहावी बोर्ड परिक्षेचा निकाल 8 जून रोजी दुपारी 1 वाजताच्या दरम्यान जाहीर करण्यात आला होता. तर यंदा निकाल जून महिन्यात पहिल्या आठवड्यात लागू शकतो. तर 12 वी बोर्ड परिक्षेचा निकाल मे महिन्याच्या 201 तारखेनंतर जाहीर करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अद्याप याबद्दल महाराष्ट्र बोर्डाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.(हेही वाचा-अकरावी प्रवेशासाठी पुढील वर्षी इन हाऊस कोट्याला कात्री, आरक्षण 103% वर गेल्याने शासनाचा निर्णय)

दहावी आणि बारावी बोर्ड परिक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना www.maharashtraeducation.com या संकेतस्थळावर भेट देऊन तुम्ही निकाल पाहू शकता. तर, नव्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची या अभ्यासक्रमानुसार घेतली जाणारी ही पहिलीच परीक्षा असल्याने अधिकाधिक मुलांचा सकारात्मक निकाल लागण्याची शक्यता आहे.