
सोलापूर (Solapur) येथील एका विद्यार्थीने शिक्षण घेण्यासाठी पैसे नसल्याच्या नैराश्यात विष प्राशन करत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रुपाली पवार असे विद्यार्थीनीचे नाव असून तिने केलेल्या आत्महत्येमुळे घरातील मंडळींना धक्का बसला आहे.
मोहोळ तालुक्यात रुपाली रहात होती. तर रुपाली हिला बीटेक मध्ये शिक्षण घेण्यासाठी प्रवेश मिळाला. तर बीटेकच्या प्रवेशासाठी किला पंजाब मधील जालिंदर शहरातील लव्हली प्रोफेशनल अकादमीत प्रवेश मिळाला होता. रुपालीला प्रवेशासाठी प्रथम तिला 10 हजार रुपये तिने भरले. मात्र एक लाख रुपये भरण्यासाठी पुरेसे पैसे कुटुंबियांकडे नव्हते. तर वडिलांनी रुपालीच्या शिक्षणासाठी शेतीसुद्धी विकली. परंतु शेती विकून पुरेसे पैसे उभे राहिले नाही.(धक्कादायक! पुण्यात हॉटेलसमोर लघुशंका करण्याच्या वादातून दोन गटात मारामारी; तरुणाचे अपहरण करून खून)
या सर्व प्रकारच्या नैराश्यामुळे रुपालीने आत्महत्या करण्याचा विचार केला. त्यासाठी रुपाली हिने किटकनाशक प्राशन करत आपले आयुष्य संपवले आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.