सुखी संसारात मोबाईलमुळे 30 टक्के कुटुंबात कलह होतात, रिपोर्ट
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: File Photo)

सध्या सोशल मीडियाच्या वापर एवढा वाढला आहे की नात्यात फूट पडण्यास सुरुवात झाली आहे. तर आता एका रिपोर्टनुसार, सुखी संसारात 30 टक्के कुटुंबात कलह होत असल्याचे समोर आले आहे.

नागपूर पोलिसांच्या भरोसा सेलच्या आकडीवरुन 30 टक्के सुखी संसारात मोबाईलच्या जास्त वापरामुळे वाद होत असल्याचे समोर आले आहे. तसेच सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे नात्यामधील गोष्ट घटस्फोटापर्यंत जाऊन पोहचली आहे. नागपूरसारख्या मोठ्या शहरात बरेच पती-पत्नी नोकरी करतात.तर सायंकाळी घरी आल्यानंतर एक-दुसऱ्यांना देण्याचा वेळ, बरेच पती-पत्नी मोबाईलवर फेसबुक, व्हॉटसअॅपला जास्त देतात. यातूनच घरगुती वादाची ठिणगी पेटली जाते. नागपूर पोलिसांच्या भरोसा सेलकडे दरवर्षी सव्वादोन हजाराच्या आसपास घरुगुती भांडणाचे खटले येतात.(ठाणे न्यायालयात आरोपीने न्यायाधीशांना चप्पल मारून केला शिवीगाळ, वाचा नेमकं घडलं काय)

यापूर्वी हुंडा, घरगुती हिंसाचार, दारुडा पती, व्यभीचार, विवाहबाह्य संबंध, नपुंसकता, अशी कारणं यापूर्वी घटस्फोटासाठी न्यायालयात दिली जायची. पण आता हायटेक युगात मोबाईल आणि सोशल मीडियाचा अतिवापरही घटस्फोटाचं कारण ठरत असल्याचे बोलले जात आहे.