Nagpur: इंडिगो एअरलाइन्सच्या विमानातून अचानक निघाला धूर, पायलटला समजताच नागपूरात केले इमर्जन्सी लँडिंग
IndiGo Aircraft | Representational Image (Photo Credits: ANI)

अहमदाबादहून लखनौला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या (Indigo Airlines) विमानाचे इमर्जन्सी लँडिंग (Aircraft emergency landing) नागपूरात करण्यात आले. वृत्तानुसार, फ्लाइटमधून धूर निघाल्यानंतर त्याचे तात्काळ लँडिंग करण्यात आले. तांत्रिक बिघाडामुळे विमानातून धूर निघत होता. या घटनेनंतर विमानाचे  नागपुरात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी विमानात 50 प्रवासी आणि 4 क्रू मेंबर्स होते. इंडिगोच्या विमानाने अहमदाबादहून सकाळी 7.15 वाजता उड्डाण केले. धूर पाहिल्यानंतर सकाळी 8.33 वाजता विमानाचे नागपुरात लँडिंग करण्यात आले. या घटनेत कोणत्याही प्रवाशाची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

वेळेत विमानाचे इमर्जन्सी लँडिंग झाल्यामुळे सर्व प्रवासी पूर्णपणे सुरक्षित आहेत. विमानातून धूर येत असल्याच्या घटनेचा अभियंता सातत्याने तपास करत आहेत.  तपासादरम्यान, फ्लाइटमध्ये कोणतीही अडचण आढळून आली नाही. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. फ्लाइटमध्ये धुराची घटना घडल्यानंतर विमानातील प्रवाशांना त्यांच्या सोयीनुसार नागपूर, लखनौ किंवा दिल्लीला नेण्यात आले. हेही वाचा PF Account मध्ये 2.50 लाखापेक्षा अधिकच्या बचतीवर कसा लागणार टॅक्स; इथे जाणून घ्या नियम 

सुदैवाने विमानातून धूर निघत असल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. अन्यथा मोठी घटना घडू शकली असती. सर्व प्रवासी पूर्णपणे सुरक्षित आहेत. इंडिगो विमानात बिघाड झाल्याची घटना शनिवारी रांचीमध्येही समोर आली होती. रांचीच्या बिरसा मुंडा विमानतळावर कोलकात्याकडे जाणारे विमान रद्द करण्यात आले. 72 आसनी विमानात 62 प्रवासी होते.

बातमीनुसार, विमानाच्या केबिन एअर कंडिशनिंग उपकरणात तांत्रिक बिघाड झाला होता. यामुळे ती रद्द करण्यात आली. आज पुन्हा एकदा इंडिगो फ्लाईटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. विमानाने उड्डाण केल्यानंतर त्यातून धूर निघू लागला. ही घटना पायलटच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने विमानाचे नागपुरात इमर्जन्सी लँडिंग केले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. सर्व प्रवासी पूर्णपणे सुरक्षित आहेत.