
सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट (Siddhivinayak Temple Trust), प्रभादेवीने 2024-25 या आर्थिक वर्षात 133 कोटी रुपयांचा वार्षिक महसूल नोंदवला आहे, जो 2023-24 मधील114 कोटी रुपयांपेक्षा 14% जास्त आहे. 31 मार्च रोजी वार्षिक अर्थसंकल्प सादरीकरणादरम्यान कार्यकारी अधिकारी वीणा पाटील यांनी ही घोषणा केली. दरम्यान, वाढत्या महसुलाच्या पार्श्वभूमीवर मंदिर ट्रस्टने सिद्धिविनायक भाग्य लक्ष्मी योजना (FD Scheme for Girls) नावाचा एक अनोखा उपक्रम सुरु केला आहे. ज्याचा उद्देश ज्याचा उद्देश मुलींच्या कल्याणाला चालना (Siddhivinayak FD Scheme for Girls) देणे आहे. या उपक्रमाबद्दल अधिक माहिती घ्या जाणून. दरम्यान, ट्रस्टच्या कल्याणकारी उपक्रमांसाठी वापरल्या जाणाऱ्या भक्तांच्या देणग्या (ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही), पूजा विधी, प्रसाद विक्री (लाडू, नारळ वडी) आणि सोने-चांदीच्या अर्पणांमुळे महसुलात वाढ (Siddhivinayak Temple Trust Earnings) झाली आहे.
मुलींच्या कल्याणासाठी सिद्धिविनायक एफडी योजना
मंदिर ट्रस्टने सिद्धिविनायक भाग्य लक्ष्मी योजना नावाचा एक नवीन उपक्रम प्रस्तावित केला आहे, ज्याचा उद्देश मुलींच्या कल्याणाला चालना देणे आहे. या योजनेअंतर्गत, ट्रस्ट महिला दिनी (8 मार्च) नागरी रुग्णालयात जन्मलेल्या प्रत्येक मुलीसाठी फिक्स्ड डिपॉझिट (एफडी) म्हणून 10,000 रुपये जमा करेल. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट चे उपकार्यकारी अधिकारी संदीप राठोड यांनी या उपक्रमाबद्दल बोलताना सांगितले की, 'ही एफडी आईच्या खात्यात जमा केली जाईल आणि ती 'बेटी बचाओ बेटी पढाओ' (Beti Bachao Beti Padhao) मोहिमेशी सुसंगत आहे.' हा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे, जो कोणत्याही मंदिर ट्रस्टने केलेला अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम आहे, असेही ते म्हमाले. (हेही वाचा, Siddhivinayak Temple Maghi Utsav Schedule: मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरात साजरा होणार माघी गणेश उत्सव; प्रशासनाने जाहीर केले वेळापत्रक)
कार्यक्षम दर्शन व्यवस्थापनामुळे देणग्या वाढतात
राठोड यांनी भर देत सांगितले की, योग्य आणि पुरेशा प्रमाणात रांग, कार्टक्षम गर्दी व्यवस्थापन यांमुळे देणग्या वाढण्यास हातभार लागला आहे. 'जेव्हा दर्शनाच्या रांगा सुरळीत होतात तेव्हा अधिक भाविक सहभागी होऊ शकतात, ज्यामुळे जास्त देणग्या मिळतात,' असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी असेही निदर्शनास आणून दिले की प्रत्येक भक्ताला दर्शनासाठी 10-15 सेकंद मिळतात, जे इतर अनेक मोठ्या मंदिरांपेक्षा जास्त असते, ज्यामुळे उदार देणग्यांवर परिणाम होतो. (हेही वाचा, Ganesh Chaturthi 2024: मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात गणरायाची ‘आरती’ संपन्न, भाविकांची गर्दी (Watch Video))
प्रसाद विक्रीत वाढ
दरम्यान, मंदिराला 2025-26 या आर्थिक वर्षात महसूल १५४ कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. महागाई आणि सोन्याच्या वाढत्या किमती असूनही, राठोड यांनी अधोरेखित केले की अधिक सोने आणि चांदीच्या अर्पणांचा लिलाव केला जात आहे आणि प्रसाद ना-नफा-ना-तोटा या तत्त्वावर विकला जातो.
मंदिर ट्रस्टने गुढी पाडव्याला (30 मार्च) वार्षिक सोने आणि चांदीचा लिलाव आयोजित केला होता, ज्यातून 1.33 कोटी रुपये उत्पन्न झाले होते. राठोड यांनी सांगितले की या कार्यक्रमात भाविकांचा प्रचंड सहभाग दिसून आला, भाविकांनी दर्शन रांगेत वाट पाहत बोली लावल्या. आगाऊ घोषणा करण्यात आल्या, ज्यामुळे भाविकांचा जास्तीत जास्त सहभाग सुनिश्चित झाला. वाढत्या आर्थिक योगदान आणि कल्याणकारी उपक्रमांमुळे, सिद्धिविनायक मंदिर संपूर्ण भारतातील भाविकांसाठी एक आध्यात्मिक आणि सामाजिक आधारस्तंभ बनले आहे.