पुण्यात (Pune) बलात्काराची (Rape) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे पोलिसांनी शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, आरोप आहे की एका अल्पवयीन मुलीवर तिच्या किशोरवयीन भावाने आणि त्यांच्या वडिलांनी स्वतंत्रपणे बलात्कार केला. यासोबतच तिचे आजोबा आणि दूरचे काका तिचा विनयभंग करत होते. गेल्या पाच वर्षांपासून हा प्रकार घडत आहे. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) विविध कलमांखाली बलात्कार आणि विनयभंगासाठी गुन्हा दाखल केला आहे, परंतु अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.
या मुलीचे वय सध्या 11 वर्षे आहे. पीडित मुलगी आणि तिचे कुटुंबीय मूळचे बिहारचे आहेत. ते सध्या पुण्यात राहतात. पुणे शहरातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात मुलीचा भाऊ आणि वडील (45) यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 376 अन्वये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. मुलीचे आजोबा (वय. 60 च्या आसपास) आणि दूरचा काका (वय सुमारे 25) यांच्यावर कलम 354 (तिच्या विनयभंगाच्या उद्देशाने महिलेवर प्राणघातक हल्ला किंवा गुन्हेगारी बळजबरी) गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस निरीक्षक (गुन्हे) अश्विनी सातपुते म्हणाल्या की, ‘शाळेत 'गुड टच आणि बॅड टच' सत्रादरम्यान मुलीने घडल्या प्रकाराबद्दल माहिती दिली. गेल्या पाच वर्षांपासून ती हे सर्व भोगत असल्याचे तिने सांगितले. सातपुते यांनी तक्रारीचा हवाला देत सांगितले की, 2017 मध्ये बिहारमध्ये राहत असताना वडिलांनी आपल्या मुलीवर तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यास सुरुवात केली. (हेही वाचा: Buldana: विवाहितेच्या मृत्यू प्रकरणी पती, सासू-सासऱ्यांसह 9 जणांविरुद्ध गुन्हा; बुलढाणा जिल्ह्यातील घटना)
त्यानंतर नोव्हेंबर 2020 च्या सुमारास मुलीच्या मोठ्या भावाने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यास सुरुवात केली. तिचे आजोबा आणि दूरचे काका तिला अयोग्यरित्या स्पर्श करायचे. या सर्व घटना स्वतंत्रपणे घडल्या असल्याने आणि आरोपींना एकमेकांच्या कृतीची माहिती नसल्याने ही सामूहिक बलात्काराची घटना ठरू शकत नाही. यामध्ये लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याची कलमे जोडली जातील.