Shivshahi Bus (Photo Credit -Twitter)

पुणे (Pune) येथील येरवाडा (Yerawada) परिसरातील शास्त्री चौकात शिवशाही बस (Shivshahi Bus Caught Fire) अचानक पेटली. बस पेटल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान दाखवले. परिणामी मोठा अनर्थ टळला. या दुर्घटनेत (Shivshahi Bus Caught Fire in Pune) कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसल्याची माहिती आहे. दरम्यान, भीषण आगीत बसचे मात्र मोठे नुकसान झाले. बस आगीच्या भक्षस्थानी पडतानाची भीषण घटना अनेकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली. सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

यवतमाळ ते चिंचवड असा दीर्घ पल्ल्याचा प्रवास करणारी शिवशाही बस येरवडा येथील शास्त्री चौकातून निघाली होती. रस्त्यावरुन धावत असताना बसमध्ये अचानक काही बिघाड झाला. ज्याचा चालकाला लगेच संशय आला. चालकाने बस रस्त्याच्या डाव्याबाजूला घेऊन थांबवली. प्रसंगावधान दाखवत प्रवाशांना खाली उतरविण्यात आले. (हेही वाचा, व्हिडिओ: शिवशाही बस जागेवरच पेटली, आलीशान गाडी जळून खाक)

ट्विट

दरम्यान, प्रवाशांना खाली उतरविण्याचे काम सुरु असतानाच बसने अचानक पेट घेतला. धक्कादायक म्हणजे ही घटना घडली तेव्हा बसमधून 42 प्रवासी प्रवास करत होते. सर्व प्रवासी सुखरुप खाली उतरल्याने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. एक मोठी दुर्घटना टळली. बसला लागलेल्या आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. एसटी महामंडळ घडलेल्या दुर्घटनेबद्दल तपशील जाणून घेत असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.

बसला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी बसला लागलेली आग आटोक्यात आणण्याचा जोरदार प्रयत्न केला. त्यात यशही आले. परंतू, तोवर बस मोठ्या प्रमाणात जळून खाक झाली होती. आगीमुळे बसचे होणारे प्रमाण रोखता आले नाही. बस जळून खाक झाली. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांच्या कामगिरीमुळे संभाव्य धोका टळण्यास मदत झाली.