भाजप (BJP) आणि केंद्रातील महात्म्यांच्या आधारे ईडी, सीबीआय आणि इतर काही केंद्रीय तपास यंत्रणांच्या ज्या धाडी पडत आहेत ते आम्ही समजू शकतो. महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ मंत्री असलेल्या नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी कार्यालयात बोलावले. कॅबिनेट मंत्र्याला ईडीचे लोक घरी येऊन घेऊन जातात. हे योग्य नाही. पण आम्हाला माहिती आहे हे 2024 पर्यंत चालेल. 2024 नंतर मात्र आम्ही आहोत आणि ते आहेत, असा थेट इशारा शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut on & BJP) यांनी भाजप आणि ईडीसह केंद्रीय तपास यंत्रणांना दिला आहे.
नवाब मलिक आणि आमच्यासारखे अनेक लोक आहेत. जे सातत्याने सत्याची बाजू मांडत असतात. जे सत्य मांडतात.. खोटारड्यांच्ये मुखवटे फाडून काढतात. त्यांच्या मागे ईडी, सीबीआय लावली जाते. आजच नवाब मलिक यांना ईडेचे लोक चौकशीला घेऊन गेले. आज भाजपच्या अनेक लोकांविरोधात ईडीकडे तक्रार झाली आहे. भाजपच्या लोकांनीच ती केली आहे. त्यांचे काय झाले? आता आम्ही पुन्हा एकदा ईडीला या तक्रारी आणि प्रकरणे देणार आहोत. आम्हाला माहिती आहे तक्रारी कशा करायच्या असतात, असेही संजय राऊत म्हणाले. (हेही वाचा, Nawab Malik In ED Office: नवाब मलिक ईडी कार्यालयात दाखल, दाऊद इब्राहिम मनी लाँड्रींग प्रकरणात चौकशी सुरु असल्याचे वृत्त)
एखाद्या गोष्टीची चौकशी होऊ शकते. आम्हाला ते माहिती आहे. पण एका कॅबिनेट मंत्र्याला ईडीचे लोक घरी येऊन घेऊन जातात. भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही भाजपच्या काही नेत्यांबाबत ईडीकडे तक्रारी दिल्या आहेत. ईडीने अद्यापही त्यांच्यावर कारवाई केली नाही. एक नोटीसही कोणाला गेली आही. थोडे दिवस जाऊ द्या एकेकाल मी एक्स्पोज करेन. ईडीच्या अधिकाऱ्यांचीही आपण पोलखोल करणार आहोत, असे संजय राऊत म्हणाले. 2024 नंतर जे काही होईल त्याचीही तयारी संबंधित अधिकाऱ्यांनी ठेवावी, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला.