Nawab Malik (Photo Credit - Twitter)

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) अर्थातच ईडी (ED ) कार्यालयात दाखल झाले आहेत. ईडीचे अधिकारी आज (23 फेब्रुवारी) सकाळी नवाब मलिक यांच्या घरी पोहोचले. त्यानंतर नवाब मलिक (Nawab Malik In ED Office) हे ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. त्यांना ईडीने अटक अथवा ताब्यात घेतले नाही. दरम्यान, दाऊद इब्राहीम मनी लॉन्डींग प्रकरणी नवाब मलिक यांना चौकशीसाठी बोलावण्यात आल्याचे समजते.

प्राप्त माहितीनुसार, आज पहाटे पाच वाजणेच्या सुमारास ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांच्या घरी पोहोचले. त्यानंतर सकाळी सात वाजता नवाब मलिक हे अधिकाऱ्यांसोबत इडी कार्यालयात पोहोचले. दाऊद इब्राहीम मनी लॉन्ड्रींग प्रकरणात चौकशीसाठी ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप या आधीच भाजप नेत्यांनी केला होता. त्यानंतर नवाब मलिक यांनी याबाबत स्पष्टोक्तीही दिली होती. त्यानंतर ईडीने मलिक यांना चौकशीसाठी बोलावल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. (हेही वाचा, Nawab Malik On Devendra Fadnavis: हा सगळा खेळ देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सुरू, नवाब मलिक यांची फडणवीस यांच्यावर टीका)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी बोलावल्याचे आताच प्रसारमाध्यमांकडून समजले. जर नवाब मलिक यांना ईडीने नोटीस दिले असेल तर त्याची उत्तरे नवाब मलिक देतील. त्यासाठी ते सक्षम आहेत. नवाब मलिक यांनी एक पत्रकार परिषद कालच घेतली. त्यानंतर लगेचच नवाब मलिक यांच्या घरी ईडीच्या घरी ईडीचे अधिकारी पोहोचणे हे आश्चर्यकारक आहे. भाजपकडून हे सुडाचे राजकारण सुरु असल्याचा आरोपही अमोल मिटकरी यांनी केला आहे.

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आह की, ईडी ही स्वयात्त संस्था असली तरी ती राहिली आहे की नाही याबाबतच संशय निर्माण झाला आहे. पाठिमागी पाच वर्षात एकाही भाजप नेत्यावर कारवाई होत नाही. मात्र, विरोधी पक्षातील कोणत्याही नेत्याने विरोधात जर काही बोलले तर लगेच त्याला ईडीच्या आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणांच्या नोटीसा पाठवायच्या. नवाब मलिक यांच्यासोबत घडत असलेला प्रकारही असाच असल्याचे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.