Kirit Somaiya on Sanjay Raut: 'भxx  शब्दाचा अर्थ माझ्या बायको आणि आईला जाऊन विचारा' संजय राऊत यांच्यावर भडकले किरीट सोमय्या
Kirit Somaiya | (File Photo)

भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आज पत्रकार परिषद घेत शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत वापरलेल्या शब्दांबाबतही जोरदार आक्षेप घेतला. त्यांनी माझ्याबद्दल 'भ**' हा शब्द वापरला. त्यांना 'भ**' या शब्दाचा अर्थ कळतो का? त्यांनी मला ज्या शिव्या द्यायच्या त्या द्याव्यात. मला आणि माझ्या पत्नीला देऊ नयेत, असे सोमय्या म्हणाले. संजय राऊत यांनी हवं तर 'भ**' शब्दाचा अर्थ   माझ्या बायकोला आणि बायको आणि आईला जाऊन विचारावा असेही सोमय्या म्हणाले. किरीट सोमय्या यांनी आजच्या पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.

किरीट सोमय्या यांनी म्हटले की, माझी बायको आणि सूनबाई या दोघेही मराठी आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातर्फे संजय राऊत अशा प्रकारची शिवीगाळ माझ्या कुटुंबीयांना करतात. त्यांनी शिवीगाळ सुरु केली आहे कारण मी त्यांची लबाडी आणि भ्रष्टाचार बाहेर काढला आहे. सरकारचे घोटाळे लोकांसमोर आणले म्हणून ते मला शिवीगाळ करत असल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला. (हेही वाचा, Kirit Somaiya वर टीका करणात Sanjay Raut यांची जीभ घसरली; म्हणाले, 2024 नंतर सोमय्यासारखे चु... लोक देशात राहणार नाहीत)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नीचे 19 बंगले उघडकीस आणल्याने मला जोड्याने मारण्याची भाषा केली जाते. पण मी इतकेच सांगतो की, मुख्यमंत्री स्वत: हे 12 कोटी जनतेची फसवणूक करत आहेत. या संपूर्ण प्रकरणावर बोलण्याची हिंमत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत नाहीत. शिवसेनेच्या एकाही नेत्यामध्ये या प्रकरणाबाबत बोलण्याची धमक नाही, अशीही टीका सोमय्या यांनी केली. मातोश्रीवरुन फोन गेल्यानंतर कोर्लाईचा सरपंच आपला जबाब बदलत असल्याचेही सोमय्या या वेळी म्हणाले.