Kirit Somaiya वर टीका करणात Sanjay Raut यांची जीभ घसरली; म्हणाले, 2024 नंतर सोमय्यासारखे चु... लोक देशात राहणार नाहीत
Sanjay Raut , Kirit Somaiya (फोटो सौजन्य - PTI)

Sanjay Raut on Kirit Somaiya: भारतात 2024 नंतर स्वच्छ आणि पारदर्शी सरकार येणार आहे. त्यामुळे सोमय्यासारखी xxxलोक देशाच्या राजकारणात राहणार नाहीत, अशा शब्दांत शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत यांनी आज सकाळी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, आज तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव दुपारी 1 वाजता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेणार आहेत. यासंदर्भात संजय राऊत यांनी माहिती दिली. यावेळी संजय राऊत यांनी देशाच्या राजकारणात अनेक बदल होणार असल्याचं सांगितलं. ममता बॅनर्जी, स्टॅलिन, केसीआर, उद्धव ठाकरे यांची गैरभाजपशासित सरकार देशाच्या आगामी राजकारणाबाबत चर्चा करत आहेत. शरद पवार आमचे मार्गदर्शक आहेत त्यांच्याशी चर्चा होईल, असंही राऊत यांनी यावेळी सांगितलं. (वाचा - Telangana CM K Chandrasekhar Rao आज एक दिवसीय मुंबई दौर्‍यावर; शहरात पोस्टरबाजी)

पत्रकारांशी संवाद साधताना राऊत यांना पत्रकारांनी किरीट सोमय्यांनी आज के. चंद्रशेखर राव यांच्या भेटी संदर्भात केलेल्या वक्तव्याबद्दल प्रश्न विचारला. यावेळी संजय राऊत म्हणाले, किरीट सोमय्या कोण आहेत? ते कोण आहेत ते मला माहिती नाही. असे चु... देशात अनेक आहेत. त्यांच्या संदर्भात प्रश्न विचारू नका. भारतात 2024 नंतर स्वच्छ आणि पारदर्शी सरकार येणार आहे. 2024 नंतर असे चु... लोक देशात राहणार नाहीत, असा इशाराही यावेळी संजय राऊत यांनी दिला.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी दुसऱ्या राज्याचा मुख्यमंत्री येतो. परंतु, त्यांचा अशा प्रकारे अपमान करण्यात येत आहे. हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचाचं नव्हे तर राज्यातील साडे अकरा कोटी जनतेचा अपमान आहे. अशा प्रकारची भाषा भाजप नेते वापरत आहेत. त्यामुळे मी त्यांनी पुन्हा चु... म्हणतो. विशेष म्हणजे केंद्र सरकारदेखील अशा लोकांना संरक्षण देत आहे. हा खूप लाजिरवाणा प्रकार आहे, असंही यावेळी संजय राऊय यांनी म्हटलं आहे.