Sanjay Raut | (Photo Credit - Twitter)

शिवसेना भवन (Shiv Sena Bhawan) येथील पत्रकार परिषदेनंतर सुरु झालेली चर्चा कायम असतानाच शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पुन्हा एकदा सूचक ट्विट केले आहे. ट्विटद्वारे सूचक इशारा देत 'बाप बेटे जेल मधे जाणार' असा पुनरुच्चार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी ट्विटमध्ये कोणाचेही नाव घेतले नाही. मात्र, संजय राऊत यांचा रोख स्पष्ट असल्याची चर्चा आहे. संजय राऊत यांचा रोख भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे चिरंजीव निल सोमय्या यांच्यावर असल्याचे बोलले जात आहे. कालच्या पत्रकार परिषदेतही संजय राऊत यांनी सोमय्या यांच्यावर निशाणा साधत त्यांना 'मुलुंडचा दलाल' असे म्हटले होते.

संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'बाप बेटे जेल मधे जाणार! Wait and watch! कोठडीचे sanitization सुरू आहे. जय महाराष्ट्र!', असे म्हटले आहे. कालच्या पत्रकार परिषदेतही संजय राऊत यांनी किरीट सोमय्या, देवेंद्र फडणवीस आणि मोहित कंबोज यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. या शिवाय माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावरही नामोल्लेख टाळत हल्ला चढवला आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणा यांच्यावहरी जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि भाजप यांच्यावरही सडकून टीका केली. (हेही वाचा, Sanjay Raut Press Conference: महाआयटीमध्ये २५ हजार कोटींचा घोटाळा, संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप)

दरम्यान, संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर आरोप करताना म्हटले होते की, ईडी आणि सीबीआयवाल्यांनीही हे ऐकावे किरीट सोमय्या ही एक फ्रॉड व्यक्ती आहे. फक्त ते इतरांवर आरोप करत राहतात. जर ते इतकेच स्वच्छ आहेत तर त्यांनी निकॉन इन्फ्रा कंन्स्ट्रक्शन कंपनी ही कोणाची आहे? याचे उत्तर द्यावे. ही कंपनी किरीट आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांची आहे. या कंपनी पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवान पार्टनर आहे. पीएमसी घोटाळ्यातील आरोपीने किरीट सोमय्या यांच्या जवळच्या माणसाला का जमीन विकली? असा सवाल विचारत पीएमसी घोटाळ्याच्या मास्टरमाइंडशी किरीट सोमय्या यांचे संबंध आरहे. त्यांचा पुत्र नील हा या मास्टरमाइंडच्या कंपनीत संचालक पदावर काम करत आहे. निकॉन फेज वन आणि टू असे जे हजारो कोटींचे प्रकल्प उभा केले आहेत तो सर्व पैसा पीएमसी बँक घोटाळ्यातील आहे, असे राऊत म्हणाले.