Sanjay Raut (PC - ANI)

राज्यात भाजप सरकार सत्तेत असताना महाआयटीमध्ये 25 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. संजय राऊत यांनी शिवसेना भवन (Shiv Sena Bhavan) येथे आज पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नावाचा उल्लेख केला. या घोटाळ्या प्रकरणी संजय राऊत (Sanjay Raut Press Conference) यांनी अमोल काळे आणि विजय ढवंगाळे या दोघांची नावे घेतली आहेत. या दोघांच्या खात्यातून पैसे कुठे कुठे गेले, कोणतेही टेंडर न काढता कंत्राट कोणाला दिले गेले याची तक्रारही आपण करणार असल्याचे राऊत यांनी या वेळी सांगितले.

हरियाणातील एक दूधवाला आहे. एन नरवर असे त्याचे नाव. त्या दूधवाल्याची संपत्ती 7 हजार कोटी रुपये इतकी आहे. हा दूधवाला 7 हजार कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक कसा झाला? या नरवरला ईडी ओळखते का? असा सवाल विचारत देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये या दुधवाल्याचे अनेक भाजप नेत्यांकडे येणेजाणे होते, असेही राऊत म्हणाले. महाराष्ट्रात भाजप सरकार सत्तेत आल्यानंतरच त्याची ही मालमत्ता तयार झाल्याचेही राऊत म्हणाले. (हेही वाचा, Sanjay Raut Press Conference: महाराष्ट्र आणि मराठी माणूस गांxची अवलाद नाही, संजय राऊत यांचा भाजपला इशारा)

संजय राऊत यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी दिल्लीतील मोठे भाजप नेते मला भेटले होते. हे लोक काही दिवसांपूर्वी मला तीन वेळा भेटले. त्यांनी मला वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्ही या सरकारमधून बाहेर पडा. आमची संपूर्ण तयारी झाली आहे. एक तर आम्ही राष्ट्रपती राजवट लावू. नाहीतर काही आमदार आमच्या हाताशी लागत आहेत. आपण आम्हाला सहकार्य करा. सरकारमधून बाहेर पडा. तुम्ही काही प्रमुख लोकं सरकार पाडण्यासाठी जर सहकार्य करत नसाल तर केंद्रीय तपास यंत्रणांचे लोक तुम्हाला टाईट करतील, फिक्स करतील, असेही या लोकांनी मला सांगितल्याचे संजय राऊत यांनी या वेळी म्हटले.