Rahul Shewale | Photo Credits: Facebook)

शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासमोरील आव्हाने आणि पक्षांतर्गत दबाव मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसतो आहे. एका बाजूला पक्षातील 40 आमदारांनी बंड पुकारले असताना दुसऱ्या बाजूला काही खासदारांमध्येही मतप्रवाह पाहायला मिळत आहे. खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनीही आता उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात शिवसेनेने भाजप प्रणीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्या असे म्हटले आहे. एका बाजूला आमदार फुटल्याने शिवसेना डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असतानाच दुसऱ्या बाजूला आता खासदारही बंडाच्या पवित्र्यात आहेत का? असा सवाल उपस्थित केला जातो आहे.

राहुल शेवाळे यांनी पत्रात काय म्हटले आहे?

आदरणीय उद्धवसाहेब,

सस्नेह जय महाराष्ट्र!

राहुल शेवाळे यांनी पत्रात म्हटले आहे करी, दिनांक 18 जुलै 2022 रोजी देशाच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे. या पदासाठी मा. श्री. यशवंत सिन्हा आणि मा. श्रीमती द्रौपदी मुर्मू हे दोन उमेदवार उभे आहेत. मा. श्रीमती द्रोपदी मुर्मू हे दोन उमेदवार उभे आहेत. मा. द्रोपदी मुर्मू या अदिवासी समाजादील असून सामाजिक क्षेत्रात त्यांचे बहुमूल्य योगदान आहे. श्रीमती द्रौपदी मुर्मू या राज्याच्या राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी शिक्षिका म्हणून सुरुवात केली व त्यानंतर अरोबिंदो इंटग्रील एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टीट्यूट, रायंगपूर येथे सहाय्यक प्रबंधक म्हणून कामगिरी बजावली आहे. या नंतर त्या ओडिसा सरकारच्या सिंचन विभागातील कनिष्ठ सहाय्यक पदावर कार्यरत होत्या. मा. श्रीमती मुर्मू यांनी झारखंडच्या राज्यपाल म्हमून महत्त्वाची कामगिरीसुद्धा पार पडाली आहे. (हेही वाचा, Maharashtra Cabinet Expansion Soon: नव्या सरकारचा लवकरच मंत्रिमंडळ विस्तार- देवेंद्र फडणवीस)

वंदनीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना-भाजप युती असताना एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा न दर्शविता मा. श्रीमती प्रतिभाताई पाटील या महाराष्ट्रातील असल्या कारणाने त्यांना पाठिंबा दर्शवला होता. तसेच, मा. श्री प्रणव मुखर्जी यांना देखील वंदनीय शिवसेनाप्रमुखांनी पाठिंबा दिला होता.

मा. श्रीमती द्रौपदी मुर्मू ह्यांची पार्श्वभूमी व सामाजिक क्षेत्रातील कार्य लक्षात घेता माझी आपणास नम्र विनंती आहे की, आपण मा. श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा व तसे आदेश सर्व शिवसेना खासदारांना द्यावेत.

धन्यवाद

राहुल शेवाळे

सेनाप्रमुख पाठिंबा दिला होता.

राहुल शेवाळे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र सोशल मीडियावरही शेअर केले आहे. शेवाळे यांनी केलेल्या पत्रात ट्विट आदिवासी समाजातील सक्षम आणि कतृत्त्ववान महिला म्हणून शिवसेनेने भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी लेखी मागणी माझ्या वतीने माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे.