Maharashtra Cabinet Expansion Soon: नव्या सरकारचा लवकरच मंत्रिमंडळ विस्तार- देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis | (Photo Credit : ANI)

राज्य विधानसभेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर दुसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) लवकरच होणार असल्याचे सांगितले. देवेंद्र फडणवीस यांचे मंगळवरी (5 जून) नागपूर (Nagpur ) येथे आगमन झाले. यावेळी त्यांनी राज्याच्या विकासाचा निर्धार बोलून दाखवला.

मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल. त्यानंतर राज्य अधिक विकासाभिमूक बनेल, असे फडणवीस म्हणाले. राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांचे मूळ गाव असलेल्या नागपूर येथे आगमन होताच, त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्र्यांचे भव्य स्वागत केले. (हेही वाचा, Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीस लंगड्या घोड्यावर स्वार होऊन आल्याने फार काळ टिकणार नाहीत, शिवसेनेचा सामनातून घणाघाती टीका)

ट्विट

नागपूर विमानतळावर आगमन होताच भाजप कार्यकर्त्यांनी भव्य रॅली काढत फडणवीस यांचे स्वागत केले. महाविकासआघाडीत असलेल्या शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार बंडाळी झाली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळले. बंडखोर शिंदे गटाच्या आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला. त्यानंतर 30 जून रोजी शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

ट्विट

दरम्यान, सोमवारी विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ विभागाच्या वाटपाबाबत फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यापूर्वी थोडा वेळ लागेल असे सांगितले होते.