MP Hemant Godse Tested Covid Positive: शिवसेना खासदार हेमंत गोडसे (MP Hemant Godse) यांना कोरोना विषाणूची (Coronavirus) लागण झाली आहे. गोडसे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, 'आज माझा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मागील काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी व सहकाऱ्यांनी काळजी म्हणून वैद्यकीय सल्ल्याने आवश्यकता असल्यास स्वतःची कोरोना चाचणी करावी! मी यथाशक्य माझ्या ठिकाणाहून आपली सेवा सुरु ठेवेन आणि कोरोना परिस्थितीचा आढावा घेत राहीन. तुम्ही स्वतःची काळजी घ्या, असंही हेमंत गोडसे यांनी म्हटलं आहे.
हेमंत गोडसे यांनी पुढे सांगितलं आहे की, 'आता कोरोनासोबत जगणे स्वीकारले पाहिजे. गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या जिल्ह्याचा कोरोनाचा आलेख वाढत असताना मतदारसंघातील विकास कामे, शासकीय बैठका तसेच मतदारसंघातील विविध ठिकाणी भेटी देणे गरजेचे असल्याने माझे काम सुरु होते, असंही गोडसे यांनी सांगितलं आहे. (हेही वाचा - Coronavirus Update: महाराष्ट्रात तुम्ही राहत असलेल्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण दगावले; जाणून घ्या जिल्हानिहाय आकडेवारी)
माझ्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला.मागील काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी व सहकाऱ्यांनी काळजी म्हणून वैद्यकिय सल्ल्याने गरज असल्यास स्वतःची कोरोना चाचणी करावी.
मी यथाशक्य माझ्या ठिकाणाहून आपली सेवा सुरू ठेवेन,व कोरोना परिस्थितीचा आढावा घेत राहीन. pic.twitter.com/WxLl8Pta5D
— Hemant Tukaram Godse (@mphemantgodse) September 1, 2020
हेमंत गोडसे हे नाशिक मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. यापूर्वी शिवसेनेचे कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांच्यासह त्याच्या कुटुंबातील व्यक्तींना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. आतापर्यंत अनेक दिग्गज व्यक्ती कोरोनाच्या विळख्यात सापडल्या आहेत. तसेच अनेकांनी कोरोनावर यशस्वी मातदेखील केली आहे.