Coronavirus (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) विळखा अधिकाधिक घट्ट होऊ नये यासाठी सर्व शासकीय यंत्रणा कार्यरत आहे. महाराष्ट्र आरोग्य मंत्रालयाने (Maharashtra Health Ministry) दिलेल्या माहितीनुसार, राज्यात काल (31 ऑगस्ट) दिवसभरात 11,852 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून 184 रुग्ण दगावल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 7 लाख 92 हजार 541 वर पोहोचला आहे. तर मृतांचा एकूण आकडा 24,583 वर पोहोचला आहे. तर दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे राज्यात काल दिवसभरात 11,158 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. यामुळे आतापर्यंत कोरोनावर मात करणा-या रुग्णांची संख्या 5,73,559 वर पोहोचली आहे. सद्य घडीला राज्यात 1,94,056 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

दिवसागणिक कोरोना रुग्णांचे वाढीचे प्रमाण पाहता बरे होणा-या रुग्णांची संख्या ही तितकीच जास्त असल्यामुळे ही राज्यासाठी सकारात्मक बाब आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 72.37% झाले आहे. कालपर्यंत पाठविण्यात आलेल्या 41, 38, 939 नमुन्यांपैकी 7,92,541 नमुने पॉझिटिव्ह (19.14 टक्के) आले आहेत. राज्यात 13,55,330 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 35,722 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हा व मनपा निहाय आकडेवारी (31 ऑगस्ट रात्री 8: 00 वाजेपर्यंत)

जिल्हा उपचार सुरू मृत्यू बरे झालेले रुग्ण संक्रमित रुग्ण
अहमदनगर 4069 294 16004 20367
अकोला 701 155 3012 3869
अमरावती 1173 130 3884 5187
औरंगाबाद 4822 666 17621 23109
बीड 1432 124 3263 4810
भंडारा 449 21 617 1087
बुलढाणा 1129 74 2175 3378
चंद्रपूर 1255 19 1096 2370
धुळे 1770 213 5877 7862
गडचिरोली 198 1 590 789
गोंदिया 570 17 881 1468
हिंगोली 353 35 1120 1508
जळगाव 7382 858 19194 27434
जालना 1280 132 2934 4346
कोल्हापूर 6782 646 15051 22479
लातूर 2712 273 5024 8009
मुंबई 20551 7658 117268 145805
नागपूर 11574 730 15607 28042
नांदेड 3581 225 3361 7168
नंदुरबार 1314 74 1366 2754
नाशिक 11614 867 27354 39835
उस्मानाबाद 1831 158 3923 5912
इतर राज्ये 669 72 0 741
पालघर 6689 591 18211 25491
परभणी 1332 79 1222 2633
पुणे 52712 4069 118324 175105
रायगड 5343 781 24156 30282
रत्नागिरी 1602 142 2422 4166
सांगली 5268 427 7577 13272
सातारा 5297 340 8324 13963
सिंधुदुर्ग 600 20 665 1285
सोलापूर 4713 763 14086 19566
ठाणे 21375 3809 107455 132640
वर्धा 388 17 484 890
वाशिम 317 28 1361 1707
यवतमाळ 1196 75 2050 3213
एकूण 194043 24583 573559 792542

तर राज्यात सर्वाधिक रुग्ण संख्या असलेल्या मुंबई शहरात आतापर्यंत एकूण 1,45,805 रुग्ण आढळले आहेत. मात्र यातही दिलासादायक बाब म्हणजे यात आतापर्यंत एकूण 1,17,268 रुग्णांनी कोरोनावर मात करुन बरे झाले आहेत. सध्या मुंबईमध्ये एकूण 20,554 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर 80 टक्के आहे. 24 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर 0.83 टक्के आहे. 29 ऑगस्ट 2020 पर्यंत झालेल्या कोविडच्या एकूण चाचण्या 7,68,818 इतक्या आहेत. यासह मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर 84 दिवस झाला आहे.