राम मंदिर समितीमध्ये एकातरी शिवसैनिकाला घ्या, आमदार प्रताप सरनाईक यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी
राम मंदिर (Photo Credits: PTI)

केंद्रात सत्तेत असलेल्या मोदी सरकारने अयोध्या राम मंदिर (Ayodhya Ram Mandir) प्रकरणी 5 फेब्रुवारीला अयोध्या राम मंदिरसाठी एका ट्रस्टी स्थापना केल्याचे घोषित केले होते. तर श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र असे या समितीचे नाव असून कॅबिनेटच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. तर सुन्नी वफ्फ बोर्डाला 5 एकर जमीन देण्यात आली आहे. याच पार्श्वभुमीवर शिवसेनेचे (Shiv Sena) आमदार प्रताप सरनाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narednra Modi) यांना एक पत्र लिहिले आहे. त्यानुसार शिवसेनेच्या किमान एका तरी सदस्याला राम मंदिराच्या समितीमध्ये घ्यावे असे त्यांनी पत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे. राम मंदिराच्या चळवळीमध्ये शिवसेनेचे मोलाचे कार्य असल्याचे ही प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.

राम मंदिराच्या योगदानासाठी शिवसेनेचे कार्य अमूल्य असून त्यानुसार किमान एका तरी शिवसैनिकाला राम मंदिर समितीमध्ये सहभागी करावे अशी विनंती केली प्रताप सरनाईक यांनी केली आहे. तर शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रामल्लांच्या दर्शनासाठी अयोध्येत जाणार आहेत. मात्र कोरोना व्हायरमुळे शरयू नदीच्या तिरावर आरतीचा कार्यक्रम उद्धव ठाकरे यांनी रद्द केला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत अनावश्यक ठिकाणी जाण्याचे टाळावे असे आवाहन नागरिकांना केले आहे.(राम मंदिर उभारण्यासाठी ट्रस्टची स्थापना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदेत घोषणा)

दरम्यान संजय राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातून सुमारे 2-3 हजार शिवसैनिक अयोद्धेमध्ये दाखल होणार आहेत. रामलल्लांच्या दर्शनासाठी कॉंग्रेस नेत्यांनीदेखील अयोद्धेमध्ये यावे असे संजय राऊत म्हणाले आहेत. यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी 10 शिवसेना खासदारांसोबत जाऊन रामलल्लांचे दर्शन घेतले होते. तर आताही महाविकास आघाडीचे सरकार 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल आणि पुढील 15 वर्ष ही युती कायम राहील असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. दरम्यान कोरोना व्हायरासच्या पार्श्वभूमीवर उत्तरभारतामध्ये होली मिलन कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.