शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणी अरुण गवळी याला जन्मठेप
Arun Gawli (Photo credits: Facebook)

Kamlakar Jamsandekar Murder Case: गुन्हेगारी टोळ्यांचा म्होरक्या कुख्यात अरुण गवळी (Arun Gawli) याला मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) ठोठवलेली जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे. न्यामूर्ती पी बी धर्माधिकारी आणि न्यायमूरती स्वप्ना जोही यांच्या खंडपीठाने हा निर्णय सोमावारी (9 डिसेंबर 2019) दिला. शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर (Shiv Sena corporator Kamlakar Jamsandekar) यांच्या हत्ये प्रकरणी दाखल झालेला खटल्यावर मोक्का  ( MCOCA)  न्यायालयात सुनावणी झाली.  दरम्यान, गवळी याच्यासोबत इतरही त्याच्या 11 साथिदारांनाही जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. अरुण गवळी सध्या नागपूर कारागृहात आहे.

काय आहे कमलाकर जामसांडे कर हत्या प्रकरण?

मार्च 2007 मध्ये नगरसेवक जामसांडेकर यांच्यावर राहत्या घरात हल्ला झाला. हल्लेखोरांनी जामसांडेकर यांच्यावर बंदुकीने गोळ्या झाडल्या. यात जामसांडेकर यांचा मृत्यू झाला. प्राप्त माहितीनुसार, जामसांडेकर यांचे सदाशिव सुर्वे नावाच्या व्यक्तिसोबत संपत्तीचा वाद होता. हा वाद गुन्हेगारी टोळ्यांमार्फत हत्याप्रकरणापर्यंत पोहोचला.

सदाशिव सुरवे हा दोन व्यक्तींच्या माध्यमातून अरुण गवळी याच्या संपर्कात आला. या दोन व्यक्ती या गवळी गँगच्या होत्या. गवळी याच्याशी भेट झाल्यानंतर सुरवे याने गवळी गँगच्या 2 जणांना जामसांडेकर याच्या खुनाची सुपारी दिली. ही सुपारी 30 लाख इतक्या रकमेची होती.

(हेही वाचा, अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याला फर्लो रजा मंजूर, प्रदीर्घ काळानंतर मुंबईत परतणार)

दरम्यान, सुपारी मिळाल्यानंतर गवळी गँग कामाला लागली. हत्येचा संशय आपल्यावर येऊ नये यासाठी गवळी गँगने प्रताप गोडसे याच्यामार्फत नवे शूटर शोधले. हे शुटर शोधण्याचे काम श्रीकृष्ण गुरव याच्यावर सोपविण्यात आले होते. श्रीकृष्ण याने श्रीकृष्णने नरेंद्र गिरी आणि विजयकुमार गिरी या दोन शूटरची निवड केली. या दोघांना या कामी प्रत्येकी 2.50 लाख रुपये देण्याचे ठरले. हिसार म्हणून या व्यवहारातील 20 हजार रुपये त्यांना रोख देण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजयकुमार गिरी आणि अशोक कुमार जायसवार हे दोघे तब्बल 15 दिवस जामसांडेकर यांच्यावर लक्ष ठेऊन होते. अखेर 2 मार्च 2007 या दिवशी जामसांडेकर यांची त्यांच्या राहत्या घरात हत्या झाली.

दरम्यान, या हत्येनंतर तब्बल एक वर्षानंतर अरुण गवळी याला पोलिसानी अटक केली. तत्कालीन गुन्हे शाखा प्रमुख राकेश मारिया, अतिरिक्त पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस निरिक्षक दिनेश कदम, धनंजय दौंड, नीनाध सावंत, योगेश चव्हाण या अधिकाऱ्यांच्या पथकाने गवळीला अटक केली. तेव्हापासून त्याची रवानगी कारागृहातच आहे.