महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: शिरूर लोकसभा मतदारसंघातून NCP चे अमोल कोल्हे विजयी;  शिवसेना व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मोठा पराभव
Dr. Amol Kolhe | (Photo Credit : Facebook)

महाराष्ट्रभर युतीची आघाडी दिसून येत असताना राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) धुरा सांभाळत शिरूर मतदार संघातील (Shirur Loksabha Constituency) अमोल कोल्हे (Amol Kolhe)यांनी  5 लाख 42 हजार 256 मतं मिळवत विजय आपल्या नावी केला आहे. 2019 च्या निवडणु शिवसेनेतून थेट राष्ट्रवादी मध्ये अमोल यांना उमेदवारी घोषित झाली होती. शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील  (Shivajirao Aadhalrao Patil) आणी वंचित बहुजन आघाडीचे राहुल ओव्हाळ (Rahul Ovhal) यांचा दमदार पराभव करत अमोल कोल्हे यांच्या गळ्यात शिरूर मतदारसंघाच्या खासदारपदाची विजयी माळ पडली आहे. यंदा देशासह महाराष्ट्रामध्ये एनडीएच्या बाजूने कौल दिला जाणार आहे. असे एक्झिट पोलच्या बरोबरीने सुरूवातीच्या कलांमधून समोर आले आहे.मात्र शिरूर मध्ये मतमोजणीला सुरवात झाल्यापासूनच अमोल कोल्हे हे आघाडीवर पाहायला मिळत होते.

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल

यंदा महाराष्ट्रात ४८ मतदारसंघांमध्ये चार टप्य्यात मतदान पार पडले होईल, यांचे निकाल आज सकाळी आठ वाजल्यापासून हळूहळू समोर येत आहेत.