संगमनेर (Sangamner) मध्ये कॉंग्रेस पक्षाचे शिर्डी शहराध्यक्ष (Shirdi Congrss City President) सचिन चौगुले (Sachin Chaughule) यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. हा हल्ला मंगळवार 2 जानेवारी दिवशी झाला आहे. संगमनेर मधील आश्वी गावात शरद पवारांच्या कार्यक्रमानंतर परतत असताना हा हल्ला झाला आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार,या हल्ल्यामध्ये 10-12 जणांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे. हल्ला झालेलं ठिकाण हे राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या शिर्डी मतदारसंघातील गाव आहे.
सचिन काल कार्यक्रमावरून परतत असताना त्यांच्या समोर अचानक 10-12 जणांनी गाडी घालत प्राणघातक हल्ला केला आहे. सचिन यांच्यासोबत सुरेश आरणे हा सोबत असलेला व्यक्ती देखील जखमी झाला आहे. या हल्ल्यानंतर दोघांनाही संगमनेर या त्यांच्या तालुक्यातील खाजगी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान पदाधिकार्यांवर झालेल्या या प्राणघातक हल्ल्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी चौगुले यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. 'हल्ल्याची घटना ही दहशतवादी कृत्य असून विरोधकांचा आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न असल्याची' प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. पोलिसांनी निपक्षपातीपणे कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. Radhakrishna Vikhe Patil On Devendra Fadnavis: एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील भाजप नेता म्हणतो 'देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री' .
सध्या पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. काही दिवसांपूर्वीच सचिन चौघुले यांनी मंत्री विखे पाटलांवर जोरदार टीका केली होती. हा हल्ला झाल्यामुळे पुन्हा एकदा बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे यांच्यातील वाद समोर आला आहे.