महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी ED च्या कारवाईवर शरद पवार यांची प्रतिक्रिया; 'तुरूंगवास कधी भोगला नाही पण हा अनुभव घ्यायलाही आवडेल'
Sharad Pawar (Photo Credits: Twitter/ ANI)

राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी (Maharashtra State Cooperative Bank Scam) सक्तवसुली संचालनालयाने (ED) शरद पवार (Sharad Pawar), अजित पवार(Ajit Pawar) यांच्यासह अनेक बड्या नेत्यांची नावं समोर करण्यात आली आहेत. काल (24 सप्टेंबर) दिवशी गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वृत्तानंतर राजकीय क्षेत्रामध्ये चर्चा रंगायला लागली असली तरीही शरद पवारांनी यावर प्रतिक्रिया देताना मला तुरूंगवासाचा अनुभव नाही पण तो घ्यायला आवडेल. माझ्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात मला तुरूंगात जावं लागलं तरीही मला काही त्रास नाही असं म्हण्त संयमी भूमिका घेतली आहे.

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरात अनेक दिग्गज नेत्यांची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. आता शरद पवारांचं नावं यामध्ये समोर आल्यानंतर बारामती बंदची हाक देण्यात आली आहे. तर शरद पवार यांचा नातू रोहित पवारनेही खास फेसबूक पोस्टच्या माध्यमातून 'लहानपणी क्रिकेट खेळताना एखादा चांगलं खेळत असेल तर लगेच एखादा चिडका मुलगा यायचा. माझी बॅट, माझा बॉल म्हणून चिडून बॅट-बॉल घेवून जायचा. तसंच हे ED चं प्रकरण चालू असल्याचा संशय येतो. चांगलं खेळता येत नसलं की काहीही करून चिडायचं. फक्त एक गोष्ट लक्षात असूद्या... आपला गडी लई भारी आहे,' असी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा: शरद पवार यांच्यावरील ED च्या कारवाईच्या निषेधार्थ  बारामती बंद.

ANI Tweet

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरण काय?

2005 ते 2010 दरम्यान राज्य सहकारी बँकेवर वर्चस्व असणाऱ्या संचालक मंडळांनी नियमबाह्य कर्जाचे वाटप केलले. राज्यातल्या अनेक सहकारी साखर कारखाने सूतगिरणी मिलप प्र्माणे काही सहकारी संस्थांना कर्जाचं वाटप कले आणि हे कर्ज नियमबाह्य पद्धतीने दिल्याने त्यामध्ये 1500 कोटीहून अधिक रूपयांचा गैरव्यवहार झाल्याचे आरोप ईडीकडून करण्यात आले आहेत.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी दिलीपराव देशमुख, ईशरलाल जैन, जयंत पाटील, शिवाजीराव नलवडे, आनंदराव अडसूळ यांच्या नावाचादेखील समावेश आहे. सहकारी साखर कारखान्यांना कर्ज वितरणात अनियमितता असल्याचा आरोप या सार्‍यांवर ठेवण्यात आला आहे.