राष्ट्रवादी (NCP) व शरद पवार (Sharad Pawar) यांचे होमग्राउंड अशी ओळख असणारे बारामती (Baramati) उद्या म्हणजेच 25 सप्टेंबर रोजी बंद ठेवण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे . महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून (ED) शरद पवार व अजित पवार (Ajit Pawar) यांच्या सह काही नेत्यांवर आज गुन्हा दाखल करण्यात आला होता, या निर्णयाच्या निषेधार्थ उद्या बारामती येथील सामाजिक संघटना एकत्र येऊन बंद पुकारणार असल्याचे समजत आहे. प्राथमिक माहितीनुसार, बारामतीतल्या शारदा प्रांगणात या संघटनांचे कारकर्ते एकत्र जमा होऊन ईडीच्या निर्णयाचा निषेध करणार आहेत.
महाराष्ट्रात अवघ्या महिन्याभराहूनही कमी वेळेत येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर संचलनयाने हा मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत शरद पवार यांनी देखील काही वेळापूर्वी प्रतिक्रिया देत आपल्यावर गुन्हा दाखल केल्याबाबत कल्पनाही नसल्याचे सांगितले,मी कधीही कोणत्याच बँकेचा संचालक नव्हतो,किंवा या संबंधित बँकेशी माझे सदस्य म्हणूनही संबंध नव्हते. मग माझा कर्जवाटपाशी संबंध काय? हा सर्व प्रकार माझ्या दौऱ्याला मिळत असणाऱ्या प्रतिसादाकडे बघून घडवण्यात आला आहे असेही ते म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा हा 1961 पासून चर्चेत आहे, त्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण यांची सत्ता होती तसेच या बँकेच्या संचालक पदी अजित पवार होते. अधिकृत नियमांच्या पलीकडे जाऊन बँकेने काही जणांना कर्जवाटप केल्याचा आरोप होता. या,उले बँकेचे तब्बत 25 हजार कोटी नुकसान झाले होते. याबाबत 2015 साली सुरिंदर सिंग यांनी तक्रार केली होती मात्र मागील चार वर्षात याप्रकरणी कोणतीही कारवाई झाली नाही मात्र आत अविधानसभेच्या तोंडावरच ईडीला कारवाई करणे सुचले आहे, असे म्हणत अनेक विरोधी पक्षांनी निषेध नोंदवायला सुरुवात केली आहे.